Railway New Rules: 1 मार्चपासून रेल्वेचे नियम बदलणार; ‘या’ 5 बदलांचा तुमच्या प्रवासावर होणार थेट परिणाम

भारतीय रेल्वे 1 मार्च 2026 पासून तिकीट प्रणाली आणि प्रवास नियमांमध्ये काही क्रांतिकारी बदल करणार आहे.

Railway New Rules: 1 मार्चपासून रेल्वेचे नियम बदलणार; ‘या’ 5 बदलांचा तुमच्या प्रवासावर होणार थेट परिणाम

Railway New Rules:  जर तुम्ही वारंवार रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वे 1 मार्च 2026 पासून तिकीट प्रणाली आणि प्रवास नियमांमध्ये काही क्रांतिकारी बदल करणार आहे. रेल्वे स्थानकावर तुमची गैरसोय होऊ नये आणि दंड भरावा लागू नये, यासाठी हे नवीन अपडेट्स समजून घेणे आवश्यक आहे.

1. 'UTS' ॲप बंद, आता 'RailOne' सुपर ॲपचा वापर
सर्वात मोठा बदल अनारक्षित (General) आणि प्लॅटफॉर्म तिकिटांशी संबंधित आहे. 1 मार्च पासून जुने 'UTS on Mobile' ॲप पूर्णपणे बंद होणार असून, त्याऐवजी RailOne ॲप कार्यान्वित होईल. या एकाच 'सुपर ॲप'द्वारे प्रवाशांना जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, मासिक पास (MST) सोबतच आरक्षण आणि लाईव्ह ट्रेन स्टेटसची सुविधा मिळेल.

2. तिकीट बुकिंगसाठी 'आधार' अनिवार्य
तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेने नियम अधिक कडक केले आहेत. आता IRCTC किंवा RailOne अॅपवरून तिकीट बुक करताना आधार पडताळणी (Aadhaar Verification) अनिवार्य असेल. तसेच, बुकिंग सुरू झाल्याच्या पहिल्या 30 मिनिटांत एजंटांना तिकीट काढता येणार नाही, जेणेकरून सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळण्याची शक्यता वाढेल.

3. वेटिंग लिस्ट प्रवाशांसाठी कडक नियम
गाड्यांमधील गर्दी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव, आता केवळ कन्फर्म किंवा RAC तिकीट असलेले प्रवासीच स्लीपर आणि सर्व AC कोचमध्ये प्रवेश करू शकतील. चार्ट तयार झाल्यानंतरही ज्यांचे तिकीट वेटिंग (WL) राहील, त्यांना आरक्षित डब्यात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

4. सामानावर सहापट दंड आणि प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा
ट्रेनमध्ये मर्यादेपेक्षा जास्त सामान नेणे आता महागात पडू शकते. विहित मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यास सामान्य भाड्याच्या 6 पट दंड आकारला जाईल. दुसरीकडे, प्रवाशांना एक मोठा दिलासाही देण्यात आला आहे. आता कन्फर्म तिकिटावरील प्रवासाची तारीख कोणताही अतिरिक्त कॅन्सलेशन चार्ज न देता ऑनलाइन बदलता येईल (केवळ भाड्यातील फरक द्यावा लागेल). ही सुविधा जागा उपलब्धतेवर अवलंबून असेल.

हेही वाचा – Ethanol Blended Petrol: वाहनचालकांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून देशभर 'हे' पेट्रोल अनिवार्य; तुमच्या गाडीवर काय होणार परिणाम?

5. बोर्डिंग पॉईंट बदलण्याची सुधारित सुविधा
आता प्रवाशांना ट्रेन सुटण्यापूर्वी चार्ट तयार झाल्यानंतरही त्यांचा बोर्डिंग पॉईंट (ज्या स्टेशनवरून गाडीत चढायचे आहे ते ठिकाण) बदलता येईल. ही सुविधा दुसऱ्या चार्ट तयार होईपर्यंत उपलब्ध असेल, ज्यामुळे प्रवाशांना ऐनवेळी मोठा फायदा होईल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number