Rahul Gandhi claims Economic Tsunami in India : पश्चिम आशियातील अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जागतिक पातळीवर प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या आंतरराष्ट्रीय संघर्षाचे थेट चटके भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसू लागले असून देशांतर्गत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. या वाढत्या महागाईच्या आणि जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. ‘देशात लवकरच अशी काही महाभयंकर आर्थिक त्सुनामी येणार आहे, जी भारताने आधी कधीही पाहिली नसेल,’ असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशाच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात आता वादाचे मोठे वादळ निर्माण झाले आहे.
‘लोकांच्या संतापामुळे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवेल’
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील आगामी आर्थिक परिस्थितीबाबत अनेक गंभीर शक्यता वर्तवल्या. ते म्हणाले की, ‘सध्या देशातील अंतर्गत परिस्थिती अतिशय वेगाने बदलत असून शासकीय आणि आर्थिक यंत्रणांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. सरकार ज्या प्रकारे परिस्थिती हाताळत आहे, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण होत आहे. भविष्यात या जनक्षोभाचा असा काही भडका उडेल की देशात आणीबाणीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.’ एवढ्यावरच न थांबता, ‘आजपासून बरोबर 1 वर्षानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नसतील,’ असा थेट राजकीय बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
भयंकर आर्थिक सुनामी आ रही है और नरेंद्र मोदी इसके बारे में न कुछ कर रहे हैं, न कर सकते हैं। समझिए क्यों? pic.twitter.com/h2HKeh7Jp0 — Congress (@INCIndia) June 3, 2026
आदिवासी इस ज़मीन के पहले मालिक हैं, लेकिन वनवासी वो हैं, जो जंगल में रहते हैं। जैसे एक पेड़ की जड़ें सबसे पहले ज़मीन को छूती हैं, उसे ज़मीन से जोड़ें रखती हैं। वैसे ही आदिवासी- हिंदुस्तान की सांस्कृतिक जड़ हैं। आदिवासी समाज के बिना देश आगे नहीं बढ़ सकता। : नेता विपक्ष श्री… pic.twitter.com/v39NZUyIa7 — Congress (@INCIndia) June 3, 2026
मोदींचे जनतेला इंधन बचतीचे आवाहन; काय आहे पार्श्वभूमी?
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारताचे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.
परकीय चलनाची बचत: या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला देशाप्रती जबाबदारी ओळखून पेट्रोल आणि डिझेलच्या वापरात जास्तीत जास्त बचत करण्याचे आवाहन केले होते.
बचावात्मक उपाययोजना: इंधनाची बचत केल्यास परकीय चलनाची होणारी घसरण रोखता येईल आणि देशाला आर्थिक संकटातून वाचवता येईल, अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी मांडली होती.
हेही वाचा – Ritabrata Banerjee TMC : ममतांचा पक्ष फोडला, पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’ राबवणारे ऋतब्रत बॅनर्जी कोण?
‘हा फक्त भीती पसरवण्याचा उद्योग’; भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
राहुल गांधी यांनी केलेल्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) तात्काळ आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर एक सविस्तर पोस्ट शेअर करत राहुल गांधींचा समाचार घेतला. ‘भारत आर्थिक त्सुनामीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा राहुल गांधींचा दावा पूर्णपणे तथ्यहीन आणि खोटा आहे. ते केवळ जनतेच्या मनात भीती आणि संभ्रम पसरवण्याचे जाणीवपूर्वक काम करत आहेत,’ असा थेट आरोप अमित मालवीय यांनी केला.
भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित; अमित मालवीय यांचे स्पष्टीकरण
अमित मालवीय यांनी भारताच्या आर्थिक स्थितीचे सविस्तर विश्लेषण करताना सांगितले की, जर देशाची अर्थव्यवस्था आणि तिची सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाली असती, तर कच्च्या तेलाचे गगनाला भिडलेले भाव, पश्चिम आशियातील भीषण युद्ध, विसकळीत झालेली आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी आणि जागतिक वित्तीय धोरणातील अनिश्चितता या सर्व अडथळ्यानंतरही भारताची अर्थव्यवस्था आज एवढ्या मजबुतीने कशी काय धावत आहे? भारत सध्या केवळ एका बाह्य जागतिक धक्क्याचा खंबीरपणे सामना करत आहे, आपण अजिबात असहाय्य नाही. गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने भारताचे आर्थिक सुरक्षा कवच अधिक मजबूत केले असून देश कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
According to Rahul Gandhi, the Chief Election Commissioner, intelligence chiefs, judges, institutions, and practically everyone in the system have been secretly working for him for the last three years, constantly feeding him information. Yet, despite having this extraordinary… pic.twitter.com/uEanGoZov6 — Amit Malviya (@amitmalviya) June 4, 2026
हेही वाचा – Capital Gains Tax: ‘या’ गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; सरकार रद्द करणार भांडवली नफा कर?