Pune ST Adhik Maas tour: अधिक मासानिमित्त पुणे एसटी महामंडळाची भाविकांना मोठी भेट; ‘या’ ठिकाणांसाठी विशेष पॅकेज टूर जाहीर

अधिक मासाच्या पवित्र महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. हीच बाब विचारात घेऊन पुणे विभागाच्या वतीने विशेष धार्मिक पर्यटन फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

Pune ST Adhik Maas tour: अधिक मासानिमित्त पुणे एसटी महामंडळाची भाविकांना मोठी भेट; ‘या’ ठिकाणांसाठी विशेष पॅकेज टूर जाहीर

Pune ST Adhik Maas tour : धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अधिक मासाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागीय कार्यालयाने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पवित्र महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. हीच बाब विचारात घेऊन पुणे विभागाच्या वतीने विशेष धार्मिक पर्यटन फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. भाविकांना अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि खिशाला परवडणाऱ्या दरात प्रवास करता यावा, या उद्देशाने एसटी महामंडळाने हे विशेष नियोजन केले आहे.

दोन वेगवेगळ्या प्रसिद्ध धार्मिक मार्गांचे नियोजन
पुणे विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शिवाजीनगर आगारामार्फत या विशेष पॅकेज टूर सेवा चालवल्या जाणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत भाविकांना काही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे. या टूरच्या माध्यमातून कोकणातील निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या प्रसिद्ध श्री गणपतीपुळे मंदिराचे थेट दर्शन घेण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे. दुसऱ्या विशेष फेरीत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता आणि कर्नाटक सीमेवरील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर येथे भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली जाईल.

हेही वाचा – Nanded: नांदेडमध्ये नवदांपत्याकडून गावाला मोठी भेट; 3500 ग्रामस्थांना दिलं अपघात विमा संरक्षण; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा

नियोजनबद्ध प्रवासामुळे दर्शनाची प्रक्रिया होणार अधिक सुलभ
या विशेष पॅकेज टूर सेवेमुळे भाविकांना पूर्व नियोजन करून प्रवास करणे सोपे जाणार असून, वेगवेगळ्या गाड्या बदलण्याचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. प्रवाशांना थेट तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचवून तेथून परत आणण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाने घेतली आहे. यामुळे वृद्ध नागरिक आणि महिला भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. या धार्मिक फेऱ्यांसाठी लागणारे आरक्षण आणि वेळेचे सविस्तर वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीसाठी आगारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

खासगी वाहनांऐवजी लालपरीला पसंती देण्याचे आवाहन
पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अ. भ. सिया यांनी या संदर्भात नागरिकांना आणि भाविकांना एक विशेष आवाहन केले आहे. खासगी ट्रॅव्हल्स किंवा अनधिकृत वाहनांच्या प्रवासातील धोके टाळण्यासाठी जनतेने शासकीय आणि अत्यंत विश्वासार्ह असलेल्या एसटी बसनेच प्रवास करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. या पॅकेज संदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच तिकिट आरक्षणासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या किंवा संबंधित एसटी आगाराशी थेट संपर्क साधावा, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी! सावंतवाडी स्थानकाला नवे नाव देण्यास हिरवा कंदील; राज्य मंत्रिमंडळाकडून कोकण, डोंबिवली आणि नागपूरसाठी महत्त्वाचे निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number