Pune Accident: कार आली आणि चिरडून गेली…; सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळता खेळता 5 वर्षीय लेकराचा करुण अंत

चिमुकल्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीच्या आवारात आजी समोर असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला.

Pune Accident: कार आली आणि चिरडून गेली…; सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळता खेळता 5 वर्षीय लेकराचा करुण अंत

Pune Loni Kalbhor Accident : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात असलेल्या 'जॉय नेस्ट' सोसायटीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निष्कर्ष आश्वत स्वामी हा 5 वर्षांचा चिमुकला आपल्या आजीसोबत सोसायटीच्या आवारात खेळत असताना, एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. 19 जानेवारी रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास ही घटना घडली. सायकल चालवत असताना अचानक समोर आलेल्या कारचा अंदाज न आल्याने आणि चालकाला मुलगा न दिसल्याने हा अपघात झाला. या धडकेत निष्पाप निष्कर्षचा जागीच मृत्यू झाला असून, ही संपूर्ण घटना सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलीस कारवाई आणि तक्रार
या हृदयद्रावक घटनेनंतर निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय 40) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी निष्कर्ष हा त्याच्या आजी, सरस्वती रेड्डी यांच्यासोबत खाली आला होता. आजी समोर असतानाच काळाने घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, चालक सोसायटीतील रहिवासी होता की बाहेरील, याचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा – Pune Dating App Scam : डेटिंग ॲपवरील मैत्री पडली महागात, पुण्यात तरुणाला निर्जन स्थळी बोलावलं आणि…ऐकून बसेल तुम्हालाही धक्का

सायकल स्पर्धेनिमित्त पुणे पोलिसांची नियमावली
एकीकडे ही अपघाताची घटना ताजी असतानाच, शहरात आयोजित 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नागरिकांना काही विशेष सूचना दिल्या आहेत. डेक्कन पोलीस ठाण्याकडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकात नागरिकांना अजब परंतु सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे:

– आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू वेगात सायकल चालवत असल्याने, नागरिकांनी आपली लहान मुले आणि पाळीव प्राणी यांना रस्त्यावर किंवा सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ मोकळे सोडू नये.
– सुरक्षेच्या कारणास्तव आज शहरातील अनेक शाळा दुपारच्या सत्रात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– नागरिकांनी स्पर्धेचा आनंद घेताना शिस्त पाळावी आणि केवळ फुटपाथवर उभे राहून टाळ्या वाजवून खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवावे.

सुरक्षेचे आवाहन आणि खबरदारी
लोणी काळभोरमधील अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सोसायटीच्या पार्किंगमध्ये आणि रस्त्यांवर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार, रहिवाशांनी आपली वाहने चालवताना आणि मुले खेळत असताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सायकल स्पर्धेच्या मार्गावर 9:00 ते 6:00 या वेळेत टप्प्याटप्प्याने रस्ते बंद राहणार असून, वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणेकरांनी प्रशासनाला सहकार्य करून कोणत्याही प्रकारचे अपघात टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Badlapur Crime : बदलापूरात अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनचालकाचा अत्याचार; आरोपी अटकेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number