Devendra Fadnavis: पुणे शहराचा होणार कायापालट! वाहतूक कोंडीतून मुक्ती अन् आरोग्य सोयींचे जाळे; मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पुढील 3 ते 4 वर्षांत पुणे शहराचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसेल, असे आश्वासन फडणवीसांनी आज दिले.

Devendra Fadnavis: पुणे शहराचा होणार कायापालट! वाहतूक कोंडीतून मुक्ती अन् आरोग्य सोयींचे जाळे; मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पुढील 3 ते 4 वर्षांत पुणे शहराचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसेल, असे आश्वासन फडणवीसांनी आज दिले. पुण्यातील विविध महत्त्वाच्या विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. पुण्याला एक आधुनिक आणि गतिमान शहर बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती: देशातील पहिले पीपीपी कॅन्सर हॉस्पिटल
मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील आरोग्य सेवांच्या विस्तारावर विशेष भर दिला. राज्यात मोठे कॅन्सर ग्रीड तयार करण्याचे काम सुरू असून, सामान्यांना आधुनिक उपचार मोफत मिळावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे. देशातील पहिले PPP (Public-Private Partnership) तत्त्वावरील कॅन्सर रुग्णालय पुण्यात सुरू होत आहे. येथे सामान्य नागरिकांना CGHS दरात दर्जेदार उपचार मिळतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांचा वेग
पुण्याच्या विस्तारित भागातील पाणी प्रश्न आणि वाहतुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. कोंढवा आणि मुंढवा भागातील पाणी प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 2017 मध्ये मान्यता दिलेल्या या योजनेचा पाठपुरावा करून अनेक तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. उरलेली कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, दोन महिन्यांनी ते स्वतः याचा आढावा घेतील. नवीन समाविष्ट झालेल्या 12 गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी 890 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वाहतूक आणि मेट्रो: 
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोचे जाळे आणि प्रामुख्याने भुयारी मेट्रोवर भर दिला जात आहे. मुंढवा येथील नवीन उड्डाणपूल शहराला अधिक गतिमान करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य शिल्प
पुणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उद्गार काढले. हे देशातील सर्वात उंच शिल्प असणार आहे. "महाराज वयाच्या 14 व्या वर्षी ग्रंथ लिहित होते, त्यांना 14 भाषा अवगत होत्या. त्यांच्या विद्वत्तेचा आणि पराक्रमाचा वारसा या शिल्पातून नवी पिढी घेईल," असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Dagdusheth Ganpati A-Class Tourism: पुण्याचे वैभव असलेल्या 'दगडूशेठ गणपती'ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; फडणवीसांची ऐतिहासिक घोषणा

कात्रज-कोंढवा रस्ता मार्गी लागणार
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आता सुटणार असून, या कामालाही लवकरच गती मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही या पाणीपुरवठा योजनांचा सातत्याने आढावा घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number