Union Education Minister: राष्ट्रपतींनी स्वीकारला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; आता ‘या’ केंद्रीय मंत्र्याकडे सोपवण्यात आला शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

धर्मेंद्र प्रधान पायउतार झाल्यानंतर रिक्त झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मंत्रालयाची सर्व प्रशासकीय व धोरणात्मक सूत्रे आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.<br/>

Union Education Minister: राष्ट्रपतींनी स्वीकारला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; आता ‘या’ केंद्रीय मंत्र्याकडे सोपवण्यात आला शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

Union Education Minister:  केंद्रीय राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या खांद्यावर आता शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान पायउतार झाल्यानंतर रिक्त झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मंत्रालयाची सर्व प्रशासकीय व धोरणात्मक सूत्रे आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींची मंजुरी
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो मंजुरीसाठी राष्ट्रपती भवनाकडे पाठवला होता. पंतप्रधानांच्या या शिफारशीची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला आहे. या मंजुरीनंतर लगेचच प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त धुरा सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन जवळपास महिनाभर सुरू होते. ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनही मागे घेण्यात आले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number