Winter Session 2025: प्रसाद लाड यांना सभागृहात लागला शॉक; म्हणाले, ‘मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल’

विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्याच क्षणी त्यांना बाकावर हलका विद्युत धक्का बसल्याचा दावा केला.

Winter Session 2025: प्रसाद लाड यांना सभागृहात लागला शॉक; म्हणाले, ‘मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल’

Maharashtra Winter Session 2025: राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आज नागपुरात सुरू असताना विधान परिषदेत एक अनपेक्षित प्रसंग घडला. विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्याच क्षणी त्यांना बाकावर हलका विद्युत धक्का बसल्याचा दावा केला. सलग दोन ते तीन वेळा शॉक जाणवल्याचे सांगताच सभागृहात एकचं हशा पिकला.  

हेही वाचा – Sharad Pawar Birthday : देशाच्या राजकारणाचे भीष्माचार्य, 86 वर्षांचा तरुण योद्धा; शरद पवारांच्या वाढदिवशी 86 किलो लाडूवाटप

प्रसाद लाड यांनी सांगितलं की, “मला इथं शॉक बसतो. मला काही झालं तर राज्याचे नुकसान होईल,” असे मिश्कीलपणे म्हणताच सभागृहात एकचं हशा पिकला. त्यांच्या टिप्पणीवर अनेक सदस्यांनी विनोदी टिप्पण्याही केल्या. त्यानंतर संपूर्ण सभागृहात वातावरण हलके झाले. या प्रसंगानंतर सभागृहातील संवाद चांगलाच रंगला  “मला इकडे शॉक बसतोय,” असे लाड यांनी म्हटल्यावर, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी “या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा,” अशी विनोदी मागणी केली. तर खाली बसलेल्या भाजपाचे प्रविण दरेकर यांनी, “तुम्हाला काही झालं तर पुतळा उभारू,” असे उत्तर देताच सभागृहात पुन्हा एकदा हशा पिकला.

हेही वाचा – BMC Election 2025 : मुंबईतील मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये शिवसेनेला पसंती; भाजप सर्व्हेतून माहिती समोर

या दरम्यान, सभापती राम शिंदे यांनी परिस्थिती हलक्या फुलक्या स्वरात हाताळत, “तुम्ही सभागृहाचे लाड आहात… तुम्हाला काही होऊ देणार नाही. काळजी घेतली जाईल,” असे आश्वासन दिले. या चर्चेनंतर सभागृहात थोडे हलके आणि विनोदी वातावरण निर्माण झाले.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number