Praniti Shinde: प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस; ‘त्या’ विधानामुळे केला अब्रूनुकसानीचा दावा

एका रस्तेकामाच्या श्रेयवादावरून गोरेंनी केलेल्या बोचऱ्या टीकेची गंभीर दखल घेत प्रणिती शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Praniti Shinde: प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस; ‘त्या’ विधानामुळे केला अब्रूनुकसानीचा दावा

Praniti Shinde: सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष आता न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. एका रस्तेकामाच्या श्रेयवादावरून गोरेंनी केलेल्या बोचऱ्या टीकेची गंभीर दखल घेत प्रणिती शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपल्या वक्तव्याबाबत 7 दिवसांच्या आत बिनशर्त माफी न मागितल्यास फौजदारी अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा या नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.

रस्तेकाम आणि 'दिल्ली'चे कनेक्शन
मोहोळ-वळसंग रस्त्याच्या श्रेयवादावरून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली होती. 7 मे रोजी माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला होता. "खासदार शिंदे सोलापूरच्या रस्त्यांचा विचार करत नाहीत, तर त्या दिल्लीतील राहुल गांधी यांच्या घरासमोरील रस्त्याचा विचार करतात," असे विधान गोरेंनी केले होते. या विधानामुळे आपल्या सामाजिक प्रतिमेला ठेच पोहोचल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

नोटिशीमधील महत्त्वाचे मुद्दे 
पालकमंत्र्यांचे विधान हे केवळ राजकीय नसून ते एका लोकप्रतिनिधीच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारे आणि द्विअर्थी असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. प्रणिती शिंदे यांच्या वतीने प्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रिया आवले आणि अॅड. आर्या राजेभोसले यांनी ही नोटीस धाडली आहे.  या नोटिशीमध्ये केवळ ताज्या विधानाचाच नाही, तर यापूर्वी जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंबद्दल केलेल्या इतर आक्षेपार्ह विधानांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

गोरे की शिंदे? सोलापूरचे राजकारण तापले
जयकुमार गोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असले तरी सोलापूरच्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात आपला मोठा प्रभाव निर्माण केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रणिती शिंदे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वीही गोरेंनी प्रणिती शिंदे यांच्यावर "सुशीलकुमार शिंदेंनी उभी केलेली काँग्रेस संपवल्याची" टीका केली होती. मात्र, आताच्या या नोटिशीमुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Varsha Gaikwad on CM Devednra Fadanvis: मुख्यमंत्री बुलेटवरून विधानभवनात आले त्या गाडीची पीयुसीच एक्सापायर; वर्षा गायकवाडांनी थेट साधला निशाणा, नेमकं काय म्हणाल्या?

पुढील पाऊल काय?
पालकमंत्र्यांना ही नोटीस मिळाल्यापासून एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. आता जयकुमार गोरे आपली चूक मान्य करून माफी मागणार की कायदेशीर लढाई लढून उत्तर देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number