PMC Election 2026 : उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांचं अजब आदोलन; ‘खाली डोकं वर पाय’ करत घोषणाबाजीने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनं लक्ष वेधलं

निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत असताना ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

PMC Election 2026 : उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांचं अजब आदोलन; ‘खाली डोकं वर पाय’ करत घोषणाबाजीने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनं लक्ष वेधलं

PMC Election : विविध ठिकाणी विविध पक्षांकडून उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट दिले जात आहे. अनेक पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत आणि आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही खदखद वेगवेगळ्या मार्गांनी बाहेर पडत आहे. शरद पवार गटातून (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने एका इच्छुकाने चक्क ‘खाली डोकं, वर पाय’ म्हणजेच शीर्षासन करत आंदोलन केले.

पुण्याच्या पर्वती किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातील जागावाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे या आंदोलनातून दिसून आले. पक्षाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या कार्यकर्त्याने भररस्त्यात हे अनोखे आंदोलन केले, ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यभरात होत आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “खाली डोकं वर पाय, या राष्ट्रवादीचं करायचं काय?” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, या घोषणांमध्ये सुप्रिया सुळे, अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पक्षातील निष्ठावंतांना डावलून इतर उमेदवारांना संधी दिली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

हेही वाचा – PMC Election 2026: पाषाणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंड; प्रमोद निम्हणांचे तिकीट कापल्याने गावकरी रस्त्यावर

पुणे शहरात शरद पवार गटात उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत असताना ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. “पक्षाची धोरणे आणि निर्णय हे जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या हिताचे नसून ते ‘उफराटे’ आहेत,” हे दाखवण्यासाठी शीर्षासन करण्यात आले. या नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण केला असून, आगामी काळात ही नाराजी कशी दूर केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनाचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत. पुण्यातील राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वीच चांगलेच तापले असून, प्रत्येक जागेसाठी इच्छुकांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारे बंड थोपवणे हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. जर वेळेत यावर तोडगा निघाला नाही, तर याचा फटका महाविकास आघाडीच्या मतांना बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Pooja More Video : पहलगामसंबंधित ‘ते’ वक्तव्य भोवलं; पूजा मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला, ओक्साबोक्सी रडतं सांगितला घडलेला प्रकार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number