Winter Session 2025: लोकसभेचे अध्यक्ष राधाकृष्णन यांचं खास स्वागत, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींचं संबोधन

सत्राची सुरुवात होताच पंतप्रधानांनी राधाकृष्णन यांची निवड “वरिष्ठ सभागृहासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी” असल्याचे म्हटले.

Winter Session 2025:  लोकसभेचे अध्यक्ष राधाकृष्णन यांचं खास स्वागत, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींचं संबोधन

Winter Session 2025: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेला संबोधित करत नव्या राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांचे औपचारिक स्वागत केले. सत्राची सुरुवात होताच पंतप्रधानांनी राधाकृष्णन यांची निवड “वरिष्ठ सभागृहासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी” असल्याचे म्हटले. पंतप्रधान म्हणाले, “हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि या महत्त्वाच्या सभागृहाचे नेतृत्व तुम्ही करत आहात, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तुमचा अनुभव आणि शांत नेतृत्व राज्यसभेला अधिक परिणामकारकतेने दिशा देईल, याची आम्हाला खात्री आहे.” तसेच, राधाकृष्णन यांच्या साध्या कुटुंबातून आलेल्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, “समाजसेवेसाठी आयुष्य अर्पण केलेल्या राधाकृष्णन यांच्या वाटचालीत प्रेरणा दडलेली आहे.” झारखंडमधील आदिवासी भागात राज्यपाल म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. प्रोटोकॉलपेक्षा लोकांशी नातं जपणं हे तुमच्या कामाचं वैशिष्ट्य राहिलं, असंही यावेळी मोदींनी नमूद केलं.  

हेही वाचा – Sunil Gavaskar: सुनिल गावसकरांचा कॉनराडला सल्ला; “वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्या”

विरोधकांवर पंतप्रधानांचा निशाणा

सत्र सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर थेट टीका केली. त्यांनी म्हटले की, काही पक्ष पराभवानंतर संसदेला “निराशेचे मैदान” बनवण्याचा प्रयत्न करतात, जे लोकशाहीला अशोभनीय आहे. हिवाळी अधिवेशन ही केवळ औपचारिकता नाही. देशाच्या विकासाला गती देण्याची संधी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बिहार निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानाचा, विशेषतः महिलांच्या उत्साहवर्धक सहभागाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की हे लोकशाहीच्या मजबूत होत चाललेल्या पायांचे लक्षण आहे.

हेही वाचा – Elections 2025 : मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ! तब्बल 7 हजार मतदारांचे वॉर्ड बदलले

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, संसद ही वाद-विवादाची जागा आहे, नाटकाची नाही. काही पक्ष बिहारमधील पराभवानंतर अस्थिर झाले आहेत. पण संसद निराशेचे व्यासपीठ बनू नये. नवीन खासदारांना चर्चेत संधी न मिळाल्याने ते खिन्न होतात, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदी म्हणाले, पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांना, पक्ष कोणताही असो, संसदेत बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे. नाटक करण्यासाठी इतर अनेक ठिकाणे आहेत. पण संसद ते स्थळ नाही. मोदी यांनी सर्व पक्षांना सहकार्याची भावना जपून रचनात्मक चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number