PM Modi On Energy Saving: पंतप्रधान मोदींचे 24 तासांत दुसऱ्यांदा आवाहन; इंधन बचत, वर्क फ्रॉम होमसह दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

जागतिक संकटाचे पडसाद भारतावर कमीत कमी उमटावेत, यासाठी लोकांनी आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करावेत, असे आवाहन मोदींनी यावेळी केले.<br/>

PM Modi On Energy Saving: पंतप्रधान मोदींचे 24 तासांत दुसऱ्यांदा आवाहन; इंधन बचत, वर्क फ्रॉम होमसह दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

PM Modi On Energy Saving: मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वडोदरा येथील 'सरदार धाम वसतिगृहा'च्या उद्घाटनप्रसंगी देशातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जागतिक संकटाचे पडसाद भारतावर कमीत कमी उमटावेत, यासाठी लोकांनी आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

'वर्क फ्रॉम होम' आणि 'कारपूलिंग'चा अवलंब करा
पंतप्रधानांनी इंधन बचतीवर विशेष भर दिला असून, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित करण्याचे सुचवले आहे. कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' आणि व्हर्च्युअल मीटिंग्जला प्राधान्य द्यावे, तसेच शाळांनी शक्य असेल तिथे ऑनलाइन वर्ग घ्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. प्रवासासाठी 'कारपूलिंग'चा पर्याय स्वीकारल्यास इंधनावरील खर्च आणि देशाची आयात कमी होण्यास मदत होईल, असे मोदींनी नमूद केले.

आर्थिक काटकसर आणि स्वदेशीचा मंत्र
वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना सोन्याची खरेदी काही काळासाठी पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. परदेशी वस्तूंना फाटा देऊन स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक शेतीकडे वळणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भरता हाच अशा संकटांवर मात करण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – LPG Cylinder Subsidy: LPG अनुदानाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'इतके' उत्पन्न असणाऱ्यांचे अनुदान होणार बंद

पश्चिम आशियातील संघर्ष: या दशकातील मोठे आव्हान
पंतप्रधानांच्या मते, गेल्या काही वर्षांत जगाने कोविड-19 सारख्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे, मात्र पश्चिम आशियातील हा संघर्ष या दशकातील सर्वात मोठे आव्हान ठरू शकतो. ज्याप्रमाणे भारताने कोरोना महामारीवर यशस्वी मात केली, त्याचप्रमाणे या जागतिक संकटातूनही देश सुखरूप बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक अस्थिरतेच्या काळात सावधगिरी आणि काटकसर हेच महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number