PM Modi On Congress: नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘काँग्रेसच्या विश्वासघातानंतर…’

जवाहरलाल नेहरूंचा प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडल्यानंतर, या विशेष प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे भावूक झाले.

PM Modi On Congress: नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘काँग्रेसच्या विश्वासघातानंतर…’

PM Modi On Congress:  केंद्रातील मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एनडीएशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. जवाहरलाल नेहरूंचा प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडल्यानंतर, या विशेष प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे भावूक झाले. "आयुष्यात मी या टप्प्यावर पोहोचेल, अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. या प्रदीर्घ प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण 'भारत माते'ची सेवा करण्याचे भाग्य केवळ ईश्वराच्या विशेष कृपेने आणि जनतेच्या प्रेमामुळेच लाभले आहे. माझ्यासाठी जनता हेच ईश्वराचे रूप आहे," अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

"काँग्रेसच्या विश्वासघातानंतर जनतेने एनडीएला निवडले"
एनडीएच्या सर्व नेत्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "2014 पूर्वीची काही दशके देशात प्रचंड अस्थिरता आणि गोंधळाची होती, ज्याचा फटका देशाला बसला. काँग्रेसने केलेल्या विश्वासघातानंतर हताश झालेल्या जनतेने एनडीएवर विश्वास टाकला. 2014 मध्ये जेव्हा आमचा विजय झाला, तेव्हा मी म्हटले होते की ही सामान्य माणसासाठी एक नवी आशा आहे. आज मला अभिमान वाटतो की, एनडीए परिवाराने गेल्या 12 वर्षांत देशाचा हा विश्वास सातत्याने अधिक दृढ केला आहे आणि जनता आता एका स्थिर व निर्णायक सरकारचे काम पाहत आहे."

'हिंदू ग्रोथ रेट' नाही, तो तर 'काँग्रेस ग्रोथ रेट' होता!
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या जुन्या धोरणांवर प्रहार केला. "एनडीएच्या 12 वर्षांतील सर्वात मोठे यश म्हणजे देश आता काँग्रेसच्या कारस्थानांच्या जाळ्यातून मुक्त झाला आहे. काँग्रेसने देशाला दारिद्र्य आणि न्यूनगंडाच्या गर्तेत लोटले होते. पूर्वी देशाला असे मानण्यास भाग पाडले गेले की भारताचा विकास केवळ संथ गतीनेच होऊ शकतो, आणि या संथ वाढीला 'हिंदू ग्रोथ रेट' असे चतुर नाव दिले गेले. वास्तविक पाहता, कामाची चुकीची संस्कृती आणि अपयश काँग्रेसचे असताना, त्याची बदनामी मात्र देशातील हिंदू लोकसंख्येच्या माथी मारली गेली. या दोषपूर्ण प्रक्रियेला खरे तर 'काँग्रेस ग्रोथ रेट' असेच नाव द्यायला हवे होते," असे मोदी म्हणाले.

हेही वाचा – PM Narendra Modi : मोदींची पंतप्रधानपदी 12 वर्ष पूर्ण! इटलीहून जॉर्जिया मेलोनी यांची खास पोस्ट चर्चेत; म्हणाल्या, "नरेंद्र मोदी हार्दिक शुभेच्छा!"

अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात विकासाची झलक दिसली, पण 2004 मध्ये देशात पुन्हा अस्थिरता आली आणि काँग्रेसने देशाला हजारो कोटींच्या घोटाळ्यांच्या मालिकेत ओढले, असा आरोप पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले, "जर अवघ्या 12 वर्षांत देश इतकी प्रगती करू शकत होता, तर आधीच्या दशकांमध्ये ती का झाली नाही? हाच 'काँग्रेस ग्रोथ रेट' आणि 'एनडीए ग्रोथ रेट' यांमधील मुख्य फरक आहे. जुन्या व्यवस्थेने लोकांना केवळ प्रतीक्षा करायला लावली आणि कामे रखडवली; मात्र आजची व्यवस्था प्रत्यक्ष परिणाम देते आणि कामे वेळेत पूर्ण करण्याची खात्री देते. म्हणूनच, 2014 ते 2026 हा प्रवास केवळ कोरडी आकडेवारी नाही, तर आपल्या पूर्ण क्षमतेनिशी वेगाने पुढे जाणाऱ्या एका खंबीर भारताची यशोगाथा आहे."
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number