Jay Pawar: ‘बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवार साहेब प्रयत्न करतायत….’; जय पवार यांचे मोठे विधान

बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असून स्वतः शरद पवार साहेबही यावर सकारात्मक भूमिका घेऊ शकतात, असे संकेत जय पवार यांनी दिले आहेत.

Jay Pawar: ‘बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवार साहेब प्रयत्न करतायत….’; जय पवार यांचे मोठे विधान

Jay Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती दिली आहे. “बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असून स्वतः शरद पवार साहेबही यावर सकारात्मक भूमिका घेऊ शकतात,” असे संकेत जय पवार यांनी दिले आहेत. ही निवडणूक अत्यंत दुःखद परिस्थितीत समोर आली असल्याने ती बिनविरोध होणेच सर्वांच्या हिताचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अजितदादांचे काम आणि बारामतीकरांचे प्रेम
जय पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “अजितदादांनी अनेक वर्षांपासून बारामतीसाठी केलेले काम आणि त्यांचे लोकांवरील प्रेम सर्वांना माहीत आहे. बारामतीकर हे दादांचे कुटुंब असून, त्यांच्या मनातही हीच भावना आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ज्येष्ठ नेते सध्या काँग्रेसच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत. मला वाटते की, अशा परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे.”

शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
“पवार साहेबही या निर्णयाचा आदर करतील आणि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करतील, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे,” असेही जय पवार यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक ज्या कारणाने आपल्यासमोर आली आहे, ती एक दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे बारामतीची परंपरा राखत सर्वच पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – Sanjay Raut At Jalgaon: संजय राऊतांचा दिलदार अंदाज! वृद्ध शिल्पकाराकडून 8 हजारांत बैलजोडी विकत घेत कलेला दिला मान

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जय पवार यांच्या या विधानामुळे बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता ‘बिनविरोध’ निवडीच्या चर्चेने जोर धरला आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष, विशेषतः काँग्रेस, या प्रस्तावावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली, तर बारामतीच्या राजकीय इतिहासात हा एक वेगळा संदेश ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number