Pankaja Munde Helicopter Technical Snag : पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड; 48 तासांतील दुसरी घटना, साताऱ्याचा दौरा रद्द

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी साताऱ्याला जाण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

Pankaja Munde Helicopter Technical Snag : पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड; 48 तासांतील दुसरी घटना, साताऱ्याचा दौरा रद्द

Pankaja Munde Helicopter Technical Snag : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी साताऱ्याला जाण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
पंकजा मुंडे आज साताऱ्यातील पिंपोडे येथे एका मोठ्या प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी निघणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टर झेपावण्यापूर्वीच (Take-off) पायलटने तांत्रिक दोष असल्याचे लक्षात आणून दिले. सुरक्षेचा कोणताही धोका पत्करायचा नाही, या विचाराने पंकजा मुंडे यांनी साताऱ्याचा आजचा दौरा तडकाफडकी रद्द केला आहे. मंगळवारीच छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे निघतानाही असाच तांत्रिक बिघाड झाला होता. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Ajit Pawar Last Video: अजितदादांचा विमान अपघाताआधीचा 'तो' शेवटचा व्हिडिओ आला समोर; काय म्हणाले होते ? पाहा

अजित पवारांच्या अपघाताने दहशतीचे वातावरण
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरलेला असतानाच पंकजा मुंडे यांच्या प्रवासात वारंवार येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक चाहत्यांनी पंकजा मुंडे यांना 'विमान प्रवास टाळा' अशा विनंत्याही केल्या आहेत.

"लोकांमध्ये भीती, पण प्रवासाला पर्याय नाही"
दरम्यान, यापूर्वी झालेल्या तांत्रिक बिघाडांनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, 'अजित पवार यांच्या भीषण अपघातानंतर सर्वांचीच मने हादरली आहेत. माझी आई प्रत्येक वेळी 'विमान लँड झाले का?' किंवा 'टेक-ऑफ झाले का?' असे विचारून काळजी व्यक्त करते. अनेक लोक मला हेलिकॉप्टरने न फिरण्याचा सल्ला देत आहेत. पण निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही. काम तर सुरूच ठेवावे लागेल,' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number