Parli Constituency Successor: पंकजा मुंडेंकडून परळीच्या राजकीय वारसदारावर शिक्कामोर्तब; अखेर भरसभेत केली मोठी घोषणा

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले.

Parli Constituency Successor: पंकजा मुंडेंकडून परळीच्या राजकीय वारसदारावर शिक्कामोर्तब; अखेर भरसभेत केली मोठी घोषणा

Parli Constituency Successor: गेल्या अनेक दशकांपासून मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलेल्या परळी मतदारसंघाबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. 'परळीवर आता धनुभाऊंना (धनंजय मुंडे) प्रेम करू द्या, मी परळी त्यांना देऊन टाकली आहे,' असे खळबळजनक विधान पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेत केले. त्यांच्या या विधानामुळे परळीचा खरा राजकीय वारसदार कोण, या वादावर आता पडदा पडला आहे.

माळाकोळीत पंकजा मुंडेंची भावनिक साद

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या राजकीय भविष्याचे आणि परळीतील बदललेल्या समीकरणांचे संकेत दिले. पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी परळी आता धनुभाऊंना देऊन टाकली आहे, ती आता तेच सांभाळतील. त्यांना मी सांगितले आहे की, हा तुमचा मतदारसंघ आहे, तुम्हीच यावर प्रेम करा. जसे माझे परळीवर प्रेम आहे, तसेच प्रेम आता मला माळाकोळीवर करू द्या. मी आता माळाकोळी सांभाळणार आहे.' 

हेही वाचा – Nana Patole: भाजपात अंतर्गत सत्तासंघर्ष? फडणवीसांना हटवण्यासाठी पक्षातीलच गट सक्रिय असल्याचा नाना पटोलेंचा दावा

40 वर्षांच्या परंपरेत मोठा बदल

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या 40 ते 45 वर्षांत परळीत भाजपची पाळेमुळे घट्ट केली होती. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी हा गड समर्थपणे लढवला. मात्र, 2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलली. एकेकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले बहीण-भाऊ आता महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. परळी नगरपालिकेत धनंजय मुंडे यांनी मिळवलेले वर्चस्व आणि आता पंकजा मुंडे यांनी स्वतःहून दिलेली 'वारसा हक्काची' पावती, यामुळे परळीच्या राजकारणात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – Narayan Rane Health Update: 'शुगर वाढल्याने चक्कर आली, पण…'; राजकीय निवृत्तीच्या चर्चांबाबत नारायण राणेंचा मोठा खुलासा

राजकारणात नव्या चर्चांना उधाण

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी परळीवरील हक्क सोडल्याचे जाहीर केल्यामुळे, त्या आगामी काळात नांदेड किंवा अन्य एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे परळीची धुरा सोपवून पंकजा मुंडे आता राज्याच्या राजकारणात नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number