Ramdas Kadam: ‘BMC मध्येही ऑपरेशन टायगर होणार…’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा

आपल्याच पक्षातील 20 लोकांना तुम्ही किती दिवस दाबून ठेवणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, आगामी काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील 'ऑपरेशन टायगर' होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Ramdas Kadam: ‘BMC मध्येही ऑपरेशन टायगर होणार…’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Ramdas Kadam: शिवसेना नेते रामदास कदम यांनी  प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. सहा बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशावर भाष्य करताना कदम म्हणाले, “येतो ट्रेलर है अभी बहुत कुछ बाकी है.” उद्धव ठाकरेंना टोला लगावताना ते पुढे म्हणाले की, कोंबडं झाकून ठेवलं तरी ते अरवल्याशिवाय राहत नाही. आपल्याच पक्षातील 20 लोकांना तुम्ही किती दिवस दाबून ठेवणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, आगामी काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.

‘तेव्हा तुम्ही कोणाला धोका दिला होता?’ राज ठाकरेंच्या मुद्द्यावरून सवाल
उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या ‘धोका दिला’ या आरोपाचा समाचार घेताना रामदास कदम यांनी भूतकाळातील एका घटनेची आठवण करून दिली. “राज ठाकरे यांचे जेव्हा 6 नगरसेवक फोडले होते, तेव्हा तुम्ही कोणाला धोका दिला होता?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. मी आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही आणि मी जे बोलतो ते नेहमी खरं होतं, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. “तुम्हाला तुमचेच लोक सोडून का जातात, याचे उत्तर आधी शोधा,” असे ते म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut Tweet: ‘त्या’ खासदारांवर संजय राऊतांची ‘गद्दार’ म्हणत जहरी टीका, ट्विटमध्ये लिहिलं,’50-50 कोटीला विकले गेलेले…’

आधीच मतदारसंघांत गेले असते तर आज ही वेळ आली नसती
बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे या 6 खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करणार असल्याच्या चर्चेवरही कदमांनी कडाडून टीका केली. “आता उद्धव ठाकरे त्या मतदारसंघांमध्ये जाणार आहेत; परंतु ते जर याच्या आधीच तिथल्या लोकांमध्ये गेले असते, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भेटले असते, तसेच त्यांच्या मतदारसंघांना योग्य निधी दिला असता, तर आज त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती,” असा टोला त्यांनी लगावला. नेत्यांना वेळेवर न भेटणे आणि निधी न देणे याच कारणांमुळे पक्ष फुटल्याचा दावा त्यांनी केला.

संजय राऊतांवर डागली तोफ; लायकीवरून काढले वाभाडे
दरम्यान, यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या वक्तव्यांचा समाचार घेताना कदम म्हणाले, “संजय राऊत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्याची तरी अवकात आहे का?” या शब्दांत त्यांनी राऊतांवर घणाघाती हल्ला चढवला. या पक्षप्रवेशामुळे येत्या काळात राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number