जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा; चकमकीत 2 सैनिक जखमी

सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे जिथे सुरक्षा दलांना हे यश मिळाले.

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा; चकमकीत 2 सैनिक जखमी
Edited Image

बांदीपोरा: जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे जिथे सुरक्षा दलांना हे यश मिळाले. यादरम्यान दोन सैनिकही जखमी झाले. सुरक्षा दलांना बांदीपोरा येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली.

सुरक्षा दलांकडून शोध अभियान सुरू – 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल असे आश्वासन दिल्यापासून सुरक्षा दलांनी परिसरात कारवाई तीव्र केली आहे. फक्त बांदीपोराच नाही, तर जम्मू आणि काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू आहे. पहलगाम असो किंवा श्रीनगर, सर्वत्र दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. 

हेही वाचा – जनरल असीम मुनीरने घडवून आणला पहलगाम हल्ला! माजी पाकिस्तानी सैनिक आदिल रझा यांचा मोठा दावा

दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले – 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी आसिफ शेख आदिलचे घर स्फोटात उडवून देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील त्राल भागातील मोंघामा येथे झालेल्या स्फोटात दहशतवादी आसिफ शेखचे घर उद्ध्वस्त करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिक शेखचे नाव पुढे आले आहे. दुसरीकडे, बिजबेहारा येथील गुरी येथील रहिवासी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आदिल याचे घरही पाडण्यात आले आहे.

हेही वाचा – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद

हल्ल्यानंतर लष्करप्रमुख श्रीनगरला पोहोचले – 

दरम्यान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. श्रीनगरला पोहोचल्यानंतर, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी लष्कराच्या व्हिक्टर मुख्यालयात पोहोचले जिथे ते जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेवर आणि लष्कराच्या कारवायांवर चर्चा करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number