Veda Sarfare Swimming Video: रत्नागिरीच्या दीड वर्षांच्या वेदाची अविश्वसनीय कामगिरी; 100 मीटर अंतर पार करून बनली सर्वात लहान जलतरणपटू

सर्वसाधारणपणे ज्यावेळी मुलं खेळण्यांच्या दुनियेत रमलेली असतात, त्याच काळात वेदाने पोहण्याचे कौशल्य आत्मसात करत इतिहास रचला आहे.

Veda Sarfare Swimming Video: रत्नागिरीच्या दीड वर्षांच्या वेदाची अविश्वसनीय कामगिरी; 100 मीटर अंतर पार करून बनली सर्वात लहान जलतरणपटू

Veda Sarfare Swimming Video: रत्नागिरीतील अवघ्या दीड वर्षांची वेदा सरफरे हिने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसाधारणपणे ज्यावेळी मुलं खेळण्यांच्या दुनियेत रमलेली असतात, त्याच काळात वेदाने पोहण्याचे कौशल्य आत्मसात करत इतिहास रचला आहे. भारताची सर्वात लहान जलतरणपटू असा सन्मान तिच्या नावावर इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने अधिकृतपणे नोंदवला आहे.

नऊ महिन्यांची असताचं केली पाण्याशी मैत्री  

रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात मोठ्या भावासोबत येताना तिची पाण्याशी जवळीक वाढली. भावाचा रोजचा सराव पाहताना तिला पाण्याची भुरळ पडली. एके दिवशी प्रशिक्षक महेश मिलके यांनी तिला हलकंच पाण्यात उतरवलं आणि आश्चर्य म्हणजे ती क्षणभरही घाबरली नाही. उलट हातपाय मारत तिने पाण्यात स्वतःची मस्ती सुरू केली आणि त्याच क्षणापासून तिची जलक्रीडेची सफर सुरू झाली.

100 मीटरचा वेगवान प्रवास

फक्त 1 वर्ष 9 महिन्यांची असताना वेदाने 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे 8 सेकंदात पूर्ण केले. इतक्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम केल्यामुळेच तिला राष्ट्रीय पातळीवरील विक्रमाची दाद मिळाली. तलावाच्या काठावर उभी राहून पाण्यात उडी मारताना तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास पाहण्यासारखा असतो.

हेही वाचा – Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात मोठी फसवणूक उघडकीस, आठ कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना अटक

पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

आई पायल सरफरे मोठ्या मुलगा रूद्रच्या सरावासाठी नेहमी तलावावर येत असताना वेदाही त्यांच्यासोबत असायची. तिथेच तिचा पाण्याशी झालेला परिचय प्रशिक्षकांच्या नजरेत भरला. महेश मिलके यांनी तिच्यातील क्षमता योग्य वेळी ओळखून सातत्याने मार्गदर्शन केले. हळूहळू ती तंत्र आत्मसात करत गेली आणि थोड्याच दिवसांत उत्तम जलतरणपटू बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

हेही वाचा – Konkan Hapus Mango : गुजरातचा डोळा आता हापूसवर, कोकण आंबा बागायतदारांची चिंता वाढली, नेमकं प्रकरण काय

‘कोकणची जलपरी’ 

आज वेदा सरफरे आपल्या अपूर्व कौशल्यासाठीही चर्चेत आहे. तिच्या यशात तिच्या चिकाटीचा, पालकांच्या पाठिंब्याचा आणि प्रशिक्षकांच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. रत्नागिरीच्या या छोट्याशा जलपरीने राष्ट्रीय विक्रमाच्या पलीकडे जाऊन अनेकांना प्रेरणा दिली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number