Omraje Nimbalkar : अखेर ओमराजेंचं ठरलं, धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर सांगितला अंतिम निर्णय; हे कारण सांगत म्हणाले..

बैठकीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेला ओमराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Omraje Nimbalkar : अखेर ओमराजेंचं ठरलं, धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर सांगितला अंतिम निर्णय; हे कारण सांगत म्हणाले..

Omraje Nimbalkar Shinde Sena Entry Updates : धाराशिव येथील ओमराजे निंबाळकर यांच्या मूळ गावी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अखेर ओमराजे यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचे नक्की केले आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतल्याचे सांगत सत्ता आणि पदासाठी मी निर्णय घेणारा माणूस नाही, असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले. त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून ओमराजे निंबाळकर काय करणार? एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार की पुन्हा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काम करण्याचा शब्द देणार? अशा चर्चा होत होत्या. अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका घेतल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केली. खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक झाली असून, त्यांच्यात सविस्तर संवाद झाल्याचे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना संमिश्र असल्या तरी, बहुतांश कार्यकर्त्यांनी विकासकामांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करावा, अशी इच्छा व्यक्त केल्याचे समजत आहे.

शिंदेंच्या नेतृत्वाचे कौतुक आणि अमित शाह यांच्याशी चर्चा
बैठकीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेला ओमराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे जाहीर कौतुक केले आहे. त्याच वेळी, पवनराजे हत्याकांडाच्या निकालात सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे समजते.

हेही वाचा – Eknath Shinde: ‘आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही…’; ओमराजेंच्या पक्ष प्रवेशावर एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

तानाजी सावंत यांच्याकडून भेटीचे संकेत
या सर्व घडामोडींच्या दरम्यान, माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत हे बैठकीच्या ठिकाणापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरणा साखर कारखाना परिसरात उपस्थित आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ मध्ये ओमराजे निंबाळकर यांची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर दिल्याची चर्चा होती. त्यांनीही आपल्याकडे ही जबाबदारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी कोर्टाचा निर्णय झाला, त्यामुळे आपले ओमराजे यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याने आपण त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले. मात्र, तेथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी गोळा झाले होते. तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते लवकरच ओमराजे यांची भेट घेणार असून, निकालाबाबतही त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावरून हा केवळ योगायोग नसून एक मोठा राजकीय निर्णय असल्याचे संकेत मिळत आहेत.

मतदारसंघभरातून आलेले कार्यकर्ते आपल्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी विविध फलक हातात घेऊन उपस्थित आहेत. सर्व परिस्थिती पाहता, ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. आता ही बाब जाहीर झाली आहे.

ओमराजेंनी सगळं सांगितलं
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जीवाभावाच्या लोकांना मी भेटलो. मते जाणून घेतली. चार तासांपासून चर्चा करीत होतो. सगळ्यांशी चर्चा करून त्यांची प्रामाणिक मते जाणून घेतली, असे ओमराजे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मशालीवर उमेदवार उभे होते. आम्ही प्रामाणिकपणे काम केले. लढाऊ बाण्याने निवडणुका लढवल्या. परंतु आम्हाला यश मिळाले नाही. आमचे कार्यकर्ते वाईट पद्धतीने हरले. सत्तेशिवाय कामे करता येत नाहीत, त्यामुळे आपण निवडणुका हरलो, असे आमच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे पडले. त्यांचे सर्व म्हणणे समजून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला. राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांच्या भरवशावरच असतात. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना सोडायला भाग पडले, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number