Anjali Damania: ‘राजकारणी नको, IPS किंवा निवृत्त न्यायाधीशांना आयोगाचे अध्यक्ष बनवा…’; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची मागणी

रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत आक्रमक पवित्रा मांडला आहे.

Anjali Damania: ‘राजकारणी नको, IPS किंवा निवृत्त न्यायाधीशांना आयोगाचे अध्यक्ष बनवा…’; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत आक्रमक पवित्रा मांडला आहे. “महिला आयोगाचे अध्यक्षपद हे कोणत्याही राजकीय नेत्याकडे न देता, एखाद्या कर्तव्यदक्ष IPS अधिकाऱ्याकडे किंवा निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवण्यात यावे,” अशी महत्त्वाची मागणी दमानिया यांनी केली आहे. केवळ राजकीय पुनर्वसनासाठी अशा महत्त्वाच्या संस्थांचा वापर होऊ नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजीनामा हा केवळ पहिला टप्पा; गुन्हे दाखल करण्याची मागणी
रूपाली चाकणकर यांचा राजीनामा म्हणजे या प्रकरणाचा शेवट नसून तो केवळ पहिला टप्पा असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. “केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, तर यापुढे कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. जर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी जाणीवपूर्वक केसेस दाबल्या असतील, तर त्यांच्यावर FIR दाखल करून सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी दमानिया यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणात ‘अनामिका’ नावाच्या पात्राचा आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकारण्यांची नावे बाहेर येणे गरजेचे
महाराष्ट्राच्या राजकारणात महिला आयोगासारख्या पवित्र संस्थेचा गैरवापर झाला असेल, तर ते दुर्दैवी आहे, असा आरोप करत दमानिया पुढे म्हणाल्या की, “या संपूर्ण गैरप्रकारात जी काही राजकारण्यांची नावे अडकलेली आहेत, ती सर्व जनतेसमोर आली पाहिजेत. महाराष्ट्राचे राजकारण आता स्वच्छ करण्याची वेळ आली आहे.” राजीनामा देताना चाकणकर ज्या पद्धतीने ‘पोज’ देऊन उभ्या होत्या, त्यावरही दमानिया यांनी कडक शब्दांत टीका केली.

हेही वाचा – ‘Wait and Watch…’ रोहिणी खडसेंचा जळजळीत इशारा; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण तापले

यंत्रणेवर विश्वास उडाल्याची भीती
सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की, “कितीही केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही,” अशी गुन्हेगारांची आणि सत्तेत असलेल्यांची मानसिकता झाली आहे, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. महिलांच्या तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी जर त्या दाबल्या जात असतील, तर पीडितांनी कुणाकडे पाहायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळेच आयोगाच्या स्वायत्ततेसाठी राजकीय व्यक्तीऐवजी निष्पक्ष अधिकारी तिथे असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number