गणेशोत्सवात डॉल्बी DJच्या वापरावर बंदी

गणेशोत्सवात कानठळ्या बसविणाऱ्या डॉल्बी डीजेचा वापर मंडळांना यंदा करता येणार नाही. यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन बेस दोन टॉप लावण्याची मुभा पोलिसांनी दिली आहे. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सूचना आणि ध्वनि प्रदुषण अधिनियमनुसार मंडळांना डॉल्बीविषयी निर्देश देण्यात आले आहेत. पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर करण्यात आली. गणेश प्रतिष्ठापना व गणेश विसर्जन मिरवणूक यात मंडळांकडून जास्त […]

गणेशोत्सवात डॉल्बी DJच्या वापरावर बंदी

गणेशोत्सवात कानठळ्या बसविणाऱ्या डॉल्बी डीजेचा वापर मंडळांना यंदा करता येणार नाही. यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन बेस दोन टॉप लावण्याची मुभा पोलिसांनी दिली आहे. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सूचना आणि ध्वनि प्रदुषण अधिनियमनुसार मंडळांना डॉल्बीविषयी निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर करण्यात आली. गणेश प्रतिष्ठापना व गणेश विसर्जन मिरवणूक यात मंडळांकडून जास्त साऊंड सिस्टीम लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मंडळं, मंडळांचे पदाधिकारी यांनी न्यायालयाच्या नियमाचं पालन करत नसल्याचे दिसून आलं.

अनेकदा साऊंड सिस्टम लावण्यावरुन मंडळे, पदाधिकारी, राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन यांच्यात वाद झाले आहेत.

गेल्यावर्षी विसर्जन मिरवणुकीत नियमांचं केलेल्या 63 जणांवर कारवाई करण्यात आलीय.

पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी गणेश मंडळाचे अधिकारी, कार्यकर्ते,  साऊंड सिस्टीम चालक आणि मालक यांना डॉल्बी डीजेचा उपयोग मिरवणुकीदरम्यान करता येणार नसल्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार आहे. मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन पोलिसांनी केलंय. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number