Video: "हमासच्या नेत्याशी हस्तांदोलन केलं आणि काही तासांतच…" नितीन गडकरींनी सांगितला इस्माईल हनियेच्या हत्येपूर्वीचा थरार

नितीन गडकरी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून तेहरानला गेले होते. या वेळी, घडलेला थरारक प्रसंग गडकरी यांनी सांगितला.

Video: &quotहमासच्या नेत्याशी हस्तांदोलन केलं आणि काही तासांतच…" नितीन गडकरींनी सांगितला इस्माईल हनियेच्या हत्येपूर्वीचा थरार

Nitin Gadkari recalled meeting with Hamas chief Ismail Haniyeh : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. हमासचा प्रमुख इस्माईल हनिये याच्या हत्येच्या अवघ्या काही तास आधी आपली त्याच्याशी भेट झाली होती, अशी आठवण त्यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सांगितली. इराणमधील एका अधिकृत दौऱ्यादरम्यान घडलेला हा धक्कादायक प्रसंग आता चर्चेत आला आहे.

तेहरानमधील ‘ती’ अनपेक्षित भेट
जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार नितीन गडकरी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून तेहरानला गेले होते. गडकरींनी सांगितले की, सोहळ्यापूर्वी ते तेहरानमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ नेते अनौपचारिक गप्पांसाठी एकत्र जमले होते. याच गर्दीत इस्माईल हनिये देखील उपस्थित होता. “मी त्याला राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य न्यायाधीशांसोबत शपथविधी सोहळ्याला जाताना पाहिले आणि आमची भेट झाली, तेव्हा आम्ही हस्तांदोलनही केले,” असे गडकरींनी नमूद केले.

हेही वाचा – India America Trade Deal: दोस्ती अपनी जगह, टॅरिफ अपनी जगह! ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ वॉर’वर भारताचा मास्टरस्ट्रोक

पहाटे 4 वाजता निरोप आणि हत्येची बातमी
शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गडकरी आपल्या हॉटेलवर विश्रांतीसाठी परतले. मात्र, पहाटे 4 च्या सुमारास इराणमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची झोप उडवली. गडकरींनी सांगितले की, “भारतीय राजदूत माझ्या खोलीवर आले आणि त्यांना तातडीने तिथून निघावे लागेल असे सांगितले. मी कारण विचारले असता, त्यांनी हमास प्रमुख इस्माईल हनियेची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी दिली. हे ऐकून मी चक्रावून गेलो; कारण, काही तासांपूर्वीच मी त्याला भेटलो होतो.”

मोबाईल फोन की गुप्त हल्ला? हत्येचे गूढ कायम
हनियेच्या मृत्यूबाबत आजही अनेक तर्कवितर्क लावले जातात, याचा उल्लेखही गडकरींनी केला. “त्याची हत्या नेमकी कशी झाली, हे आजही एक कोडेच आहे. काहींच्या मते मोबाईल फोन ट्रॅक करून हा हल्ला झाला, तर काही वेगळाच दावा करतात,” असे ते म्हणाले. या घटनेचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेवर भाष्य केले. जर एखादा देश ताकदीने मजबूत असेल, तर कोणीही त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, असे मत त्यांनी मांडले.

इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे उदाहरण
या प्रसंगाचा शेवट करताना गडकरींनी इस्रायलचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, इस्रायल हा भौगोलिकदृष्ट्या छोटा देश असला, तरी त्यांच्याकडे असलेले प्रगत तंत्रज्ञान आणि लष्करी ताकद यामुळे त्यांनी जगावर आपला प्रभाव निर्माण केला आहे. देशाची सुरक्षा ही केवळ संख्येवर नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असते, हा धडा या घटनेतून मिळतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

हेही वाचा – Indian Army Rules: Instagram वर नो लाईक, नो कमेंट! भारतीय सेनेकडून सोशल मीडिया नियमात महत्त्वाचा बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number