Nitesh Rane On Corporate Jihad: ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणी नितेश राणेंचा खळबळजनक आरोप; MIM ची नोंदणी रद्द करण्यासह केली ‘ही’ मोठी मागणी

निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता, अशी माहिती समोर आल्यानंतर राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Nitesh Rane On Corporate Jihad: ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणी नितेश राणेंचा खळबळजनक आरोप; MIM ची नोंदणी रद्द करण्यासह केली ‘ही’ मोठी मागणी

Nitesh Rane On Corporate Jihad:  कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी एमआयएम (MIM) पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता, अशी माहिती समोर आल्यानंतर राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “निदा खान ही केवळ एक मुखवटा असून या संपूर्ण कटामागे मोठे सूत्रधार आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आवश्यक आहे,” असे राणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘एमआयएम ही दहशतवादी संघटना’; नितेश राणेंची टीका
नितेश राणे यांनी एमआयएमवर जोरदार हल्लाबोल करताना या पक्षाची तुलना दहशतवादी संघटनेशी केली आहे. “एमआयएम ही राजकीय पक्ष नसून एक दहशतवादी संघटना आहे, त्यामुळे त्यांची त्याच पद्धतीने चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. ज्याप्रमाणे दहशतवादी संघटनांच्या सूत्रधारांची चौकशी होते, तशीच चौकशी या पक्षाची करून त्यांची राजकीय नोंदणी तातडीने रद्द करण्यात यावी, असे राणे यांनी म्हटले आहे. निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाची आणि पक्षाच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, यासाठी ते आग्रही आहेत.

हेही वाचा – Nashik TCS Case : धक्कादायक! MIM च्या ‘या’ नगरसेवकानेच फरार निदा खानला स्वतःच्या घरात लपायला जागा दिली?

हिंदू मुला-मुलींच्या धर्मांतराचा मोठा कट?
या प्रकरणातील अधिक गंभीर बाजू मांडताना राणे यांनी असा दावा केला की, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या असंख्य हिंदू माता-भगिनींना आणि मुला-मुलींना जाणीवपूर्वक धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात आहे. “हे लोक कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने काम करतात आणि त्यांचे उद्दिष्ट काय आहे, हे तपासल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, मुंब्रा येथील प्रकरणाचा दाखला देत त्यांनी संशय व्यक्त केला की, अनेक ठिकाणी कागदपत्रे नसतानाही हे लोक सक्रिय आहेत. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number