अनिल कपूरवर कोसळला दुःखाचा डोंगर! आई निर्मल कपूर यांचे निधन

अनिल कपूर यांची आई निर्मल कपूर या 90 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अनिल कपूरवर कोसळला दुःखाचा डोंगर! आई निर्मल कपूर यांचे निधन
Edited Image

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांच्या आईचे निधन झाले आहे. आईच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कपूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर यांची आई निर्मल कपूर या 90 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण शुक्रवारी संध्याकाळी 5.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

येत्या सप्टेंबर महिन्यात अनिल कपूर यांची आई तिचा 91 वा वाढदिवस साजरा करणार होती. पण त्याआधीच त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यानंतर त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान निर्मला कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब शोकाकुल आहे. 

हेही वाचा – अंबानी कुटुंबावर ढासळला दु:खाचा डोंगर; लाडका कुत्रा ‘हॅपी’चा मृत्यू

विरल भयानी यांनी अनिल कपूर यांच्या घराच्या परिसरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वीर पहाडियासह अनेक स्टार अनिल कपूरच्या घराबाहेर उपस्थित असलेले दिसत आहेत. निर्मला यांना अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर अशी तीन मुले आहेत. तिघेही चित्रपटसृष्टीतील मोठे दिग्गज आहेत. 

हेही वाचा – भारतात हानिया आमिर, माहिरा खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक

निर्मला यांचा मोठा मुलगा बोनी कपूर हा एक अनुभवी चित्रपट निर्माता आहे. यासोबतच संजय कपूर हे त्यांच्या काळातील उत्कृष्ठ अभिनेते राहिले आहेत. तथापि, गेल्या काही दिवसांत तो खूप कमी चित्रपटांमध्ये दिसला आहे. यानंतर, निर्मला यांचा मुलगा अनिल कपूर देखील बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. अनिल कपूर यांनी शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number