Parth Pawar Engagement: पार्थ पवार यांच्या आयुष्यात नव्या इनिंगची सुरुवात; ‘या’ काश्मिरी मॉडेलसोबत अडकणार लग्नबंधनात

पार्थ पवार यांचा साखरपुडा प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री कायनात धार हिच्यासोबत निश्चित झाला आहे.

Parth Pawar Engagement: पार्थ पवार यांच्या आयुष्यात नव्या इनिंगची सुरुवात; ‘या’ काश्मिरी मॉडेलसोबत अडकणार लग्नबंधनात

Parth Pawar Engagement: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या आयुष्यात लवकरच एका नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे. पार्थ पवार यांचा साखरपुडा प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री कायनात धार हिच्यासोबत निश्चित झाला आहे. येत्या 29 जुलै रोजी पुण्याजवळील एका फार्महाऊसवर अत्यंत खाजगी वातावरणात हा साखरपुडा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

महाकाल दर्शनादरम्यान रंगल्या होत्या चर्चा
पार्थ आणि कायनात गेल्या काही वर्षांपासून एकमेकांचे उत्तम मित्र होते. याच मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि आता दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात कायनातची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. त्याशिवाय काही काळापूर्वी या दोघांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासूनच त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते.

दिल्लीत शिक्षण, मुंबईत वावर; कोण आहे कायनात धार?
पवार कुटुंबाची होणारी सून कायनात धार ही मूळची काश्मीरची आहे. तिने आपले संपूर्ण शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले असून, सध्या ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. व्यावसायिक कारणांमुळे तिचे वास्तव्य दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही शहरांमध्ये असते.

कठीण काळात पवार कुटुंबाला दिला खंबीर आधार
पवार कुटुंबावर आलेल्या एका कठीण प्रसंगात कायनात खंबीरपणे पार्थ यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अजित पवार यांच्या अपघातानंतर तिने थेट बारामती गाठून पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच मुंबईत पार पडलेल्या सर्वपक्षीय शोकसभेतही ती पवार कुटुंबासोबत दुःखद प्रसंगात सहभागी झाली होती.

हेही वाचा – Operation Tiger Photo Viral : ठाकरेंच्या खासदारांची ती गुप्त भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं होतं; घटनाक्रम उघड

पवार घराण्यातील विवाहसोहळ्यांची मालिका
गेल्या काही काळापासून पवार कुटुंबात लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 5 डिसेंबर रोजी सुनेत्रा पवार यांचे लहान चिरंजीव जय पवार यांचा विवाह पुण्याच्या ऋतुजा पाटील यांच्याशी संपन्न झाला. त्यासोबतच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हेदेखील मुंबईच्या तनिष्का कुलकर्णी हिच्याशी विवाहबंधनात अडकले. आता या मालिकेत पार्थ पवार यांच्याही विवाहसोहळ्याची भर पडणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number