FASTag Payment Rules: सावधान! महामार्गावर प्रवास करताना ‘ही’ एक चूक आणि टोल होईल दुप्पट; जाणून घ्या फास्टॅगबाबतचा ‘हा’ महत्त्वाचा नियम

आता टोल प्लाझावर रांगा कमी करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. तसेच, टोल वसुलीच्या नियमांत बदल करण्यात आला आहे.

FASTag Payment Rules: सावधान! महामार्गावर प्रवास करताना ‘ही’ एक चूक आणि टोल होईल दुप्पट; जाणून घ्या फास्टॅगबाबतचा ‘हा’ महत्त्वाचा नियम

FASTag Payment Rules : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने टोल वसुलीच्या नियमात मोठे बदल केले आहेत. आता टोल प्लाझावर रांगा कमी करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 15 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेल्या नियमांनुसार, ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांना आता रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंटचा स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टोल वसुलीचा नवीन ‘1.25 पट’ नियम काय आहे?
जर तुमच्या वाहनावर वैध फास्टॅग नसेल, तो निकामी असेल किंवा त्यात अपुरा बॅलन्स असेल, तर आता तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
– रोख पेमेंट (Cash): तुम्ही टोल नाक्यावर रोख रक्कम भरली, तर तुम्हाला नेहमीप्रमाणे टोलच्या दुप्पट (2.0x) रक्कम मोजावी लागेल.
– UPI पेमेंट: जर तुम्ही फास्टॅगऐवजी UPI (उदा. PhonePe, GPay) द्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरले, तर तुम्हाला दुप्पट दंड भरण्याची गरज नाही. नियमानुसार, अशा वेळी तुम्हाला मूळ टोलच्या केवळ 1.25 पट रक्कम द्यावी लागेल.
उदाहरण: जर एखाद्या कारचा टोल 100 रुपये असेल, तर रोख दिल्यास 200 रुपये लागतील, पण UPI ने दिल्यास फक्त 125 रुपये द्यावे लागतील.

हेही वाचा – PM Kisan Yojana 22nd Installment : PM किसान योजनेचा 22 वा हप्ता कधी येणार? बजेटपूर्वी की नंतर? वाचा पूर्ण अपडेट

1 एप्रिल 2026 पासून रोख व्यवहार पूर्णपणे बंद?
केंद्र सरकारने टोल नाके पूर्णपणे ‘कॅशलेस’ करण्याची तयारी सुरू केली आहे. ताज्या अपडेटनुसार, 1 एप्रिल 2026 पासून देशातील महामार्गांवर रोख रक्कम स्वीकारणे पूर्णपणे बंद केले जाऊ शकते. त्यानंतर प्रवाशांना केवळ फास्टॅग किंवा UPI चाच वापर करावा लागेल. सध्या अनेक टोल नाक्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ‘नो-स्टॉप कॅशलेस टोलिंग’ची चाचणी सुरू असून, यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.

तक्रार कुठे आणि कशी करावी?
अनेकदा टोल कर्मचारी UPI स्वीकारण्यास नकार देतात आणि जबरदस्तीने दुप्पट रोख रक्कम मागतात. अशा वेळी वाहनचालकांनी घाबरून न जाता आपले अधिकार वापरले पाहिजेत.
– हेल्पलाइन नंबर: टोल कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्ही त्वरित NHAI च्या 1033 या २४ तास उपलब्ध असलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करू शकता.
– ऑनलाइन पोर्टल: तुम्ही भारत सरकारच्या CPGRAMS (pgportal.gov.in) किंवा UMANG ॲपच्या माध्यमातूनही तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रार करताना टोल नाक्याचे नाव, वेळ आणि तारीख नमूद करायला विसरू नका.

फास्टॅगचे वाढते वापर आणि फायदे
फास्टॅग आता केवळ टोल नाक्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक मोठ्या शहरांतील विमानतळ, शॉपिंग मॉल्स आणि सार्वजनिक पार्किंगमध्ये आता फास्टॅगद्वारे कॅशलेस पेमेंटची सुविधा सुरू झाली आहे. याशिवाय, काही पेट्रोल पंपांवर इंधनाचे पैसे देण्यासाठीही याचा वापर होतो. ग्राहकांसाठी वार्षिक पासची सुविधाही उपलब्ध असून, 3,000 रुपयांमध्ये वर्षभर 200 वेळा टोल ओलांडण्याची सवलत खाजगी वाहनांना मिळते.

हेही वाचा – Stray Cattle : भटक्या प्राण्यांना सांभाळा अन् दरमहा कमवा 12 हजार रुपये… काय आहे सरकारची भन्नाट योजना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number