NEET Admit Card 2025 Released: नीट युजी 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; 4 मे रोजी होणार परीक्षा

या परीक्षेसाठी अर्ज केलेले आणि त्यात सहभागी होणारे सर्व उमेदवार neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

NEET Admit Card 2025 Released: नीट युजी 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; 4 मे रोजी होणार परीक्षा
Edited Image

नवी दिल्ली: पुढील महिन्यात 4 मे रोजी होणाऱ्या NEET UG परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी म्हणजेच NTA ने NEET UG परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले आणि त्यात सहभागी होणारे सर्व उमेदवार neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरावा लागेल.

नीट यूजी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज 7 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान करण्यात आले होते. यासाठी सुमारे 23 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यावेळी ही परीक्षा पाच हजारांहून अधिक केंद्रांवर घेतली जाईल. 

हेही वाचा – मोठी बातमी! देशभरात होणार जातीय जनगणना; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नीट युजी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे? 

सर्वप्रथम उमेदवारांना neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर, उमेदवारांना होमपेजवरील NEET UG 2025 प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
हे केल्यानंतर, तुमच्यासमोर एक वेगळी विंडो उघडेल, जिथे उमेदवारांना आवश्यक तपशील भरावे लागतील.
असे केल्याने तुमच्यासमोर प्रवेशपत्र उघडेल.
आता उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट काढू शकतात.

प्रवेशपत्रासाठी थेट लिंक 

हेही वाचा – अटारी सीमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा गैरवर्तन; 2 तास उघडले नाही इमिग्रेशन गेट

यावर्षी NEET UG परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. आज उमेदवारांची प्रवेशपत्राची प्रतीक्षा संपली आहे. NEET UG 2025 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. परीक्षा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी शिक्षण मंत्रालयाने गेल्या सोमवारी सर्व राज्यांच्या डीएम-एसपींसोबत बैठक घेतली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number