बारामती : महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अशा दोन योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेंतर्गत अनेक लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता लाडक्या भावांनाही सरकारी योजनेंतर्गत कौशल्यविकास प्रशिक्षण आणि विद्यावेतन दिले जाणार आहे. या दोन्ही योजनांचा प्रचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.
विकास आणि जनकल्याण हीच अजितदादांची ओळख लाडक्या बहिणींपाठोपाठ लाडक्या भावांनाही मिळणार बळ.. तरुणांना महिन्याला 10 हजार मिळणार, युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून… अधिक माहितीसाठी क्लिक करा – https://t.co/I5GFQzzE68#MahaRashtrawadiHelpline#महाराष्ट्रवादी_हेल्पलाइन pic.twitter.com/aSSl5ASiO5 — MahaNCPspeaks (@mahancpspeaks) September 18, 2024
‘योजनांची नांदी जशी बहिणींसाठी.. तशीच भावांसाठी सुद्धा…’ या शब्दात राष्ट्रवादीने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोन सरकारी योजनांचा प्रचार सुरू केला आहे. एक्सवर राष्ट्रवादीकडून दोन्ही सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ९८६१७१७१७१ हा हेल्पलाईन क्रमांक राष्ट्रवादीने जाहीर केला आहे.