Sunil Tatkare Dance : ‘मैं हूँ डॉन’; खोपोलीप्रकरण ताजे असतानाच सुनील तटकरेंच्या डान्सची चर्चा

रायगडचे राजकीय वातावरण सध्या तापलेले असतानाच मुरुड महोत्सवातील सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Sunil Tatkare Dance : ‘मैं हूँ डॉन’; खोपोलीप्रकरण ताजे असतानाच सुनील तटकरेंच्या डान्सची चर्चा

Sunil Tatkare Dance : मुरुड महोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘डॉन’ चित्रपटातील ‘मैं हूँ डॉन’ हे गाणे लावले. गाणे सुरू होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात तुफान डान्स केला आणि तटकरे यांनाही डान्स करण्याचा आग्रह केला. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या विजयानंतर महोत्सवात उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत सुनिल तटकरे यांनीही क्षणभर मंचावर डान्स करत आनंद व्यक्त केला. मात्र ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले. परंतु, आता या डान्समुळे तटकरे यांच्या प्रतिमेला सामाजिक संवेदनशीलतेच्या मुद्द्यावरून धक्का बसेल असे वातावरण झाले आहे.

खोपोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. रायगडचे राजकीय वातावरण यासंदर्भातील आरोपांमुळे तापलेले असतानाच मुरुड महोत्सवातील सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नगरपालिकेच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तटकरे यांनी ‘डॉन’ चित्रपटातील ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर डान्स केला. हत्येसारख्या संवेदनशील घटनेनंतर आणि स्वतःवर आरोप होत असताना अशा प्रकारच्या गाण्यावर डान्स केल्यामुळे तटकरेंच्या राजकीय भूमिकेवर आणि सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

हेही वाचा – Mahapalika Elections 2026 : निवडणुकीपूर्वीच महायुतीचा विजयाचा गुलाल; राज्यभरातील 17 उमेदवार बिनविरोध, पहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येचे धागेदोरे बीडमधील गुन्हेगारी विश्वाशी जोडले जात असून, मुख्य आरोपीचे वाल्मीक कराडशी असलेले संबंध तपासून पाहिले जात आहेत.

या हत्या प्रकरणामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप होत आहेत. याशिवाय, आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत गंभीर दावा केला आहे की, या हत्येचा संपूर्ण कट खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी शिजला असून तेच या भागातील आका आहेत. आता हे सर्व प्रकरण ताजे असताना तटकरे यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या डान्स व्हिडिओमुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – Mangesh Kalokhe Death Case : ‘सुनील तटकरे रायगडचा ‘आका’, काळोखे हत्याकांडानंतर शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number