Navneet Rana : ‘ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला’, बंगालच्या निकालावर नवनीत राणांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘सनातनींचा विरोध करणाऱ्यांना…’

नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर भाष्य करताना म्हटले की, या निकालामुळे ममतादीदींचा अहंकार पूर्णपणे मोडीत निघाला आहे.

Navneet Rana : ‘ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला’, बंगालच्या निकालावर नवनीत राणांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘सनातनींचा विरोध करणाऱ्यांना…’

Navneet Rana on West Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने मिळवलेल्या यशानंतर राजकीय वर्तुळातून मोठी विधाने समोर येत आहेत. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी या विजयाचे स्वागत करताना ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल हे आपल्या भारत देशातील अविभाज्य राज्य असून ते आपल्याकडेच राहिले पाहिजे, ही भावना बंगालच्या जनतेने निकालाद्वारे सिद्ध करून दाखवल्याचे राणा यांनी म्हटले आहे. बंगालमध्ये पुन्हा एकदा ‘पोरिबर्तन’ झाले असून जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे त्यांनी नमूद केले.

ममता बॅनर्जींच्या अहंकारावर प्रहार
नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर भाष्य करताना म्हटले की, या निकालामुळे ममतादीदींचा अहंकार पूर्णपणे मोडीत निघाला आहे. जो कोणी सनातन धर्माचा किंवा हिंदू संस्कृतीचा विरोध करेल, त्यांना बंगालमधील जनतेने योग्य जागा दाखवली आहे. सनातनींचा विरोध करणाऱ्यांसोबत जनता कधीच उभी राहत नाही, हे या निकालावरून स्पष्ट झाले असल्याचे राणा यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा आणि सत्तेचा गर्व जनतेने उतरवला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – Jay Pawar: ‘दादांच्या प्रेमासाठी बारामतीकरांनी निवडणूक मनावर घेतली…’; सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयानंतर जय पवार भावूक

निकालातील निर्णायक कल आणि सुरक्षा
या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. नवनीत राणा यांच्या मते, बंगालमधील ही लढाई केवळ राजकीय नव्हती, तर ती संस्कृती आणि सुरक्षेसाठीची होती. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जनतेने तृणमूल काँग्रेसला नाकारले आहे. पश्चिम बंगालमध्ये आता भाजपच्या रूपाने एक नवीन आणि भक्कम पर्याय सत्तेत येत असून, येथील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number