PMC Election 2026 : ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत; मांडणार पुणेकरांची समस्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणेकरांच्या प्रश्नांना उत्तरे देणार असून, यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडियाची 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.<br/>

PMC Election 2026 : ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत; मांडणार पुणेकरांची समस्या

PMC Election: आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपने पुण्यात प्रचाराचा धडाका लावला असून, एक आगळावेगळा 'संवाद' सोहळा पुण्यात रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, 11 जानेवारी रोजी पुणेकरांच्या प्रश्नांना उत्तरे देणार असून, यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडियाची 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

5 लाख नागरिक होणार सहभागी

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर विभागाने एरंडवणे येथील शुभारंभ लॉन्स वर 'संवाद पुणेकरांशी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित नसून पुण्यातील सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये मोठ्या पडद्यावर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. एकाच वेळी सुमारे 5 लाख नागरिक या संवादाचे साक्षीदार होतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – BMC Election: मनपासाठी अपक्ष उमेदवारी, बंडखोरांना भाजपचा दणका, तब्बल 26 जणांवर निलंबनाची कारवाई, वाचा यादी

गिरीजा ओकची नवी इनिंग

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अभिनेत्री गिरीजा ओक. निळ्या साडीतील व्हिडिओमुळे सोशल मीडियावर 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्ध झालेली गिरीजा, आता एका गंभीर भूमिकेत म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारताना दिसेल. यापूर्वी ठाण्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता, त्यानंतर आता पुण्यातील संवादाची धुरा गिरीजा ओककडे सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा – मनसेला पुन्हा मोठा धक्का!; 'आमचा आधारच छाटला जात असेल, तर आम्ही उभं राहायचं तरी कुठे?'; नाराज मनसे नेत्यानं पक्ष सोडताना व्यक्त केली खदखद

कार्यक्रमाची रूपरेषा 

विषय: 'संवाद पुणेकरांशी' (शहराचा सर्वांगीण विकास)
प्रमुख उपस्थिती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुलाखतकार: अभिनेत्री गिरीजा ओक
दिनांक व वेळ: रविवार, 11 जानेवारी 2026 | सायंकाळी 7:00 वाजता
ठिकाण: शुभारंभ लॉन्स, डीपी रोड, एरंडवणे, पुणे

10 लाख घरांपर्यंत पोहोचणार भाजपचा 'संकल्प'

या कार्यक्रमातून भाजपच्या 'घर चलो' या व्यापक संपर्क अभियानाचा श्रीगणेशा होणार आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यातील तब्बल 10 लाख घरांमध्ये निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजेच भाजपचा 'संकल्पनामा' पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे हे देशाचे सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र आहे. शहरासमोरील आव्हाने, पर्यावरणाचे रक्षण आणि दर्जेदार शहरी जीवन यासाठी मुख्यमंत्र्यांकडे एक स्पष्ट दृष्टीकोन असून, तो या संवादातून पुणेकरांसमोर मांडला जाईल, असं भाजपचे राज्य सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितलं आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number