Nashik Election News: नाशिक महापालिकेच्या रणांगणात आता ‘ग्लॅमर’चा तडका! लोकप्रिय अभिनेत्री नुपूर सावजी भाजपच्या तिकिटावर मैदानात

तरुणाईमधील लोकप्रियता आणि वडिलांचा प्रदीर्घ अनुभव ही नुपूरची या निवडणुकीतील मोठी बलस्थाने मानली जात आहेत.

Nashik Election News: नाशिक महापालिकेच्या रणांगणात आता ‘ग्लॅमर’चा तडका! लोकप्रिय अभिनेत्री नुपूर सावजी भाजपच्या तिकिटावर मैदानात

Nashik Municipal Corporation Election : नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून यंदा राजकीय आखाड्यात अनेक प्रसिद्ध चेहरे नशीब आजमावताना दिसणार आहेत. ‘घाडगे अँड सून’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नुपूर सावजी आता अभिनयाचा पडदा सोडून थेट जनसेवेच्या रिंगणात उतरली आहे. भाजपने नाशिकमधून नुपूरला उमेदवारी जाहीर केल्याने येथील राजकीय वातावरण अधिकच चर्चेत आले आहे.

राजकारणाचे बाळकडू आणि निवडणुकीची तयारी
नुपूर सावजी केवळ एक अभिनेत्री नसून तिला राजकारणाचे धडे आपल्या घरातूनच मिळाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची ती कन्या असल्याने राजकीय डावपेचांचा वारसा तिला लाभला आहे. नुपूर नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 (क) मधून निवडणूक लढवत आहे. नुकतीच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाशिकमध्ये नुपूरच्या पॅनेलची भेट घेऊन त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तरुणाईमधील लोकप्रियता आणि वडिलांचा प्रदीर्घ अनुभव ही नुपूरची या निवडणुकीतील मोठी बलस्थाने मानली जात आहेत.

हेही वाचा – Narayan Rane: भरसभेत नारायण राणेंना भोवळ, निवृत्तीच्या चर्चांना उधाण

नाशिकमधील राजकीय समीकरणे आणि स्टार पॉवर
नाशिक महापालिकेच्या एकूण 31 वॉर्डमधील 122 जागांसाठी यंदा चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे 20 टक्के जागा राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्या आहेत, ज्यात नुपूरच्या नावाचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ नाशिकच नाही, तर मुंबईतही भाजपने अभिनेत्री निशा परुळेकरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. निशा यांनी ‘या सुखांनो या’ सारख्या मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रींच्या एन्ट्रीमुळे यंदा महापालिका निवडणुकीत ‘स्टार पॉवर’चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.

अभिनयाकडून राजकारणाकडे झेप
‘वाजलाच पाहिजे’ सारखा चित्रपट आणि अनेक प्रायोगिक नाटकांतून नुपूरने आजवर आपल्या कलेची चुणूक दाखवली आहे. मात्र, आता नाशिकच्या विकासकामांसाठी ती कंबर कसून तयार झाली आहे. भाजपने यंदा अनेक नवीन आणि कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी दिली असून नुपूर त्यापैकीच एक महत्त्वाची उमेदवार आहे. कलाविश्वाप्रमाणेच राजकारणातही नुपूर आपली छाप पाडणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा – Balasaheb Sarwade Death Case: ‘माझे पप्पा मला सोडून गेले…’; चिमुकलीची आर्त हाक ऐकून अमित ठाकरेंना रडू कोसळलं, पहा व्हिडिओ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number