Pravin Darekar On Deepak Kesarkar: नारायण राणे यांची काळजी करू नका…’; प्रवीण दरेकर यांचा दीपक केसरकर यांना सल्ला

दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची भाजपातील भूमिका कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Pravin Darekar On Deepak Kesarkar: नारायण राणे यांची काळजी करू नका…’; प्रवीण दरेकर यांचा दीपक केसरकर यांना सल्ला

Pravin Darekar On Deepak Kesarkar: शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची भाजपातील भूमिका कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या विधानावर भाजपने तातडीने प्रतिक्रिया देत हा आरोप फेटाळून लावला. पत्रकारांशी बोलताना भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केसरकरांना उद्देशून ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

दरेकर म्हणाले, “राणे साहेबांना कोणी बाजूला करणं हा मुद्दाच नाही. त्यांचा मुलगाही पक्षात सक्रिय आहे आणि स्वतः नारायण राणे हे भाजपाच्या उच्चस्तरीय कामांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्यांनी नारायण राणे यांची काळजी करून नये.”

शिवसेनेत राणेंना भोगावा लागलेले त्रास सर्वज्ञात – 

पुढे दरेकरांनी केसरकरांना हल्ला चढवत म्हटलं, “शिवसेनेत असताना राणे यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे शिवसेनेनं त्यांच्या भवितव्याची काळजी करण्याची गरज नाही. आज त्यांना ठामपणे साथ देण्याची ताकद भाजपात आहे. पक्षात त्यांना योग्य सन्मान, जबाबदाऱ्या आणि स्थान दिलं जातं. त्यांच्या महत्त्वाला कुणी कमी करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहील.”

हेही वाचा – Maharashtra Election Update: निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणूका पुढे ढकलल्या; कारण काय?

राजकीय चर्चांना उधाण 

केसरकरांच्या आरोपांनंतर निर्माण झालेल्या चर्चांमध्ये दरेकरांच्या प्रतिक्रियेमुळे आणखी रंग चढला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना युतीत या घडामोडींमुळे काही नवे राजकीय संकेत दिसू शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number