Narayan Rane Health Update: ‘शुगर वाढल्याने चक्कर आली, पण…’; राजकीय निवृत्तीच्या चर्चांबाबत नारायण राणेंचा मोठा खुलासा

नारायण राणे यांनी आता आपल्या प्रकृतीबाबत आणि राजकीय भविष्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Narayan Rane Health Update: ‘शुगर वाढल्याने चक्कर आली, पण…’; राजकीय निवृत्तीच्या चर्चांबाबत नारायण राणेंचा मोठा खुलासा

Narayan Rane Health Update: चिपळूणमधील सभेत प्रकृती खालावल्याने चर्चेत आलेले भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आता आपल्या प्रकृतीबाबत आणि राजकीय भविष्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 'माझी प्रकृती आता स्थिर असून, राजकीय संन्यास घेण्याबाबत मी कोणतेही विधान केलेले नाही,' असे म्हणत त्यांनी निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

चिपळूणच्या कृषी महोत्सवात भाषण करताना राणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्या घटनेचा खुलासा करताना त्यांनी सांगितले की, भाषणादरम्यान रक्तातील साखरेचे प्रमाण (Sugar Level) 325 च्या वर गेले होते, तसेच रक्तदाब (BP) कमी झाल्यामुळे अस्वस्थता जाणवली आणि चक्कर आली. प्रकृती बिघडल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले होते, मात्र काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर आता आपण पूर्णपणे फिट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Election 2026: सत्तेचा गैरवापर की लोकशाहीची थट्टा? बिनविरोध निवडींविरोधात मनसे-काँग्रेसची हायकोर्टात धाव; 'ही' महत्त्वाची मागणी केली

'निवृत्ती'च्या विधानाचा नवा अर्थ

काही तासांपूर्वी राणे यांनी 'घरी बसून मुलांना आशीर्वाद देईन' असे विधान केल्याने ते राजकारण सोडणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यावर राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'मी निवृत्त होतोय असं कधीच म्हणालो नाही. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी केवळ एवढेच म्हटले होते की, जर माझ्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी होत नसेल, तर अशा पदावर राहण्यात अर्थ नाही. मी कामाच्या निकालावर (Result) बोललो होतो, निवृत्तीवर नाही.' 

हेही वाचा – Harshwardhan Sapkal On Rahul Narwekar: 'राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील काळं पान आहेत…'; हर्षवर्धन सपकाळांची घणाघाती टीका

कटकारस्थानावर भाष्य

दरम्यान, सिंधुदुर्गातील भाषणात त्यांनी राजकारणातील अंतर्गत वादावरही बोट ठेवले होते. 'राजकारणात कटकारस्थाने केली जात आहेत आणि अनेकदा माझ्या कामात अडथळे आणले गेले. अशा परिस्थितीत काम करण्यावर माझा भर आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. तथापी, नारायण राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या असून, ते राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number