Namaz at Malad Railway Station: मालाड रेल्वे स्थानकात नमाज पठण; किरीट सोमय्या आक्रमक, रेल्वे प्रशासनाला विचारला जाब

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या बाजूला रेल्वेने विस्तारीकरणासाठी मोठी मोकळी जागा तयार केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी काही नागरिकांनी याठिकाणी नमाज पठण केले.

Namaz at Malad Railway Station: मालाड रेल्वे स्थानकात नमाज पठण; किरीट सोमय्या आक्रमक, रेल्वे प्रशासनाला विचारला जाब

Namaz at Malad Railway Station: मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकावर शुक्रवारी नमाज अदा करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज मालाड रेल्वे स्थानकावर पोहोचून प्रत्यक्ष पाहणी केली. रेल्वेच्या हद्दीत अशा प्रकारे नमाज पठणाला परवानगी मिळालीच कशी, असा संतप्त सवाल विचारत सोमय्या यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धाव घेतली आणि या प्रकरणाचा जाब विचारला.

रेल्वे विस्तारीकरणाच्या जागेचा नमाजसाठी वापर
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या बाजूला रेल्वेने विस्तारीकरणासाठी मोठी मोकळी जागा तयार केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी काही नागरिकांनी याठिकाणी नमाज पठण केले. हा परिसर रेल्वेच्या अधिकृत हद्दीत येत असल्याने, सार्वजनिक रेल्वे स्थानकावर अशा धार्मिक कृत्यासाठी परवानगी कोणी दिली, याबाबत भाजपकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा – Mithi River Scam: मुंबई महापालिकेच्या तिजोरीला भगदाड; मुदतठेवींमध्ये 10 हजार कोटींची घट, तर मिठी नदीच्या कामातील मोठा भ्रष्टाचार उघड

सोमय्यांकडून अधिकाऱ्यांची भेट आणि पाहणी मोहीम
किरीट सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष त्या जागेची पाहणी केली जिथे अवैधरित्या नमाज पठण झाले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती मागितली. “केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या हद्दीत अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत,” असे सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि रेल्वेच्या नियमावलीचा भंग झाला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number