Nagesh Patil Ashtikar : ‘बोलण्याचा अतिरेक अन् अविश्वास…’ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया

आपल्या बंडखोरीमागचे मुख्य कारण स्पष्ट करताना नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षांतर्गत वातावरणावर बोट ठेवले.

Nagesh Patil Ashtikar : ‘बोलण्याचा अतिरेक अन् अविश्वास…’ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया

Nagesh Patil Ashtikar First Statement After Rebellation : शिवसेना ठाकरे गटातून नुकतीच फारकत घेतलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे बंडखोरीच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर 2 ते 3 दिवसांनी कॅमेऱ्यासमोर आले आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवर आपली पहिली पोस्ट शेअर करत राजकीय वर्तुळातील चर्चांवर सविस्तर भाष्य केले आहे. आष्टीकर यांनी स्पष्ट केले की, ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अजिबात नाराज नाहीत. 'उद्धव ठाकरेंनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे, त्याबद्दल माझ्या मनात दुमत असण्याचे कारण नाही,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, खासदार संजय राऊत यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी जर काही बोलत असतील, तर तो त्यांचा हक्क असून ते आपल्या वडिलांसारखे असल्याने त्यांच्या बोलण्याचे अजिबात वाईट वाटणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

…आणि 'त्या' अविश्वासामुळे ठाकरे गट सोडण्याचा घेतला निर्णय
आपल्या बंडखोरीमागचे मुख्य कारण स्पष्ट करताना नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षांतर्गत वातावरणावर बोट ठेवले. ते म्हणाले की, 18 तारखेपर्यंत आम्ही सर्व बंडखोर खासदार कुठेही गेलो नव्हतो आणि पक्षातच होतो. परंतु, त्यानंतर ज्या प्रकारचा अविश्वास दाखवला गेला आणि बोलण्याचा अतिरेक झाला, त्यामुळेच तिथे थांबून आता काही उपयोग होणार नाही, असा विचार अनेकांच्या मनात आला. या मानसिकतेतूनच अखेर ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह बंडखोर खासदार संजय जाधव आणि संजय देशमुख हे तिघेही लवकरच आपापल्या मतदारसंघात परतणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा – Operation Tiger: ऑपरेशन टायगर संकटात? ठाकरे गटातील बंडाला खीळ; बंडखोर खासदाराच्या लेकीची मातोश्रीवर धाव

मतदारसंघाचा विकास आणि 5 कोटींच्या अपुऱ्या निधीचा अडथळा
खासदार आष्टीकर यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांची वस्तुस्थिती मांडताना सांगितले की, सत्तेशिवाय कोणतीही कामे मार्गी लागत नाहीत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मतदारांनी अत्यंत मोठ्या आशेने आपल्याला निवडून दिले असून लोकांची कामे करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मात्र, सध्या मिळणारा 5 कोटी रुपयांचा वार्षिक निधी अत्यंत अपुरा पडत असून, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त निधी मिळत नव्हता. यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना आणि मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावताना मोठी अडचण निर्माण होत होती. गेल्या 2 वर्षांपासून आपण यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

'निधी आणायचा असेल तर सत्तेत जाणे क्रमप्राप्त' – मतदारांना आवाहन
आपल्या या राजकीय पावलावर मतदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू शकतात, याची जाणीव आष्टीकर यांनी व्यक्त केली. हे पाऊल कदाचित काहींना पटेल तर काहींना पटणार नाही, असे सांगत त्यांनी जनतेला आश्वस्त केले की, 'मी आजही तुमच्यासोबतच आहे.' मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणायचा असेल आणि लोकांची रखडलेली कामे पूर्ण करायची असतील, तर सत्तेत सामील होणे क्रमप्राप्त होते, याच मोठ्या कारणास्तव आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यातील जनतेने आपल्यावर अतोनात प्रेम केले असून, भविष्यातही त्यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, असे सांगत त्यांनी आपली भूमिका शेवटपर्यंत लावून धरली.

हेही वाचा – Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष; शिंदेंनी कोणावर सोपवली 'ऑपरेशन टायगर'ची जबाबदारी?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number