Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेपासून 10 टक्के पाणीकपात लागू; धरणांतील साठा खालावल्याने BMC चा मोठा निर्णय

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला कमी पावसाचा अंदाज आणि वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता, उपलब्ध पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेपासून 10 टक्के पाणीकपात लागू; धरणांतील साठा खालावल्याने BMC चा मोठा निर्णय

Mumbai Water Cut: मान्सूनच्या आगमनाला अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच मुंबईवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे जलाशयांमधील पाणी पातळी वेगाने घटत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) संपूर्ण मुंबईत 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमके कारण काय?
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला कमी पावसाचा अंदाज आणि वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता, उपलब्ध पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मे पर्यंतची आकडेवारी पाहता, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रांत मिळून केवळ 23.52 टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. तथापी, भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातून अतिरिक्त पाणीसाठा मिळणार असला तरी, भविष्यातील नियोजनासाठी आतापासूनच कपात करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या भागांवर होणार परिणाम 
केवळ मुंबई शहर आणि उपनगरेच नव्हे, तर पालिकेकडून ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि लगतच्या गावांमध्येही ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे. समाधानकारक पाऊस होऊन धरणांतील साठ्यात वाढ होईपर्यंत ही परिस्थिती कायम असेल.

पाणी बचतीसाठी पालिकेचे 'मंत्र' 
प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता पाण्याचा थेंब न थेंब वाचवण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत:

घरगुती वापर: अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरा. दात घासताना किंवा दाढी करताना नळ सुरू ठेवू नका.

शिळे पाणी फेकू नका: आदल्या दिवशीचे पाणी शिळे समजून फेकून देण्याची चूक टाळा.

गळती रोखा: घरांत किंवा गृहनिर्माण संस्थांच्या टाकीत कुठेही पाण्याची गळती असल्यास ती तातडीने दुरुस्त करा.

वाहनांची स्वच्छता: गाडी धुण्यासाठी नळीचा वापर करण्याऐवजी ओल्या कापडाने वाहन पुसून घ्या.

वॉशिंग मशीनचा वापर: मशीनमध्ये जास्तीत जास्त कपडे साठवून एकदाच धुवा, जेणेकरून पाण्याची बचत होईल.

नोझल्सचा वापर: नळांना पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणारे 'नोझल्स' लावा, ज्यामुळे तब्बल 60-70 टक्के बचत होऊ शकते.

हेही वाचा – Mumbai Underground Tunnel : मुंबईच्या भूमिगत रस्ते प्रकल्पाला गती; 250 मीटर भूमिगत बोगदा खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण

हॉटेल्स आणि व्यावसायिकांना सूचना 
उपाहारगृहे आणि हॉटेल्सनी ग्राहकांना मागणी असेल तरच पिण्याचे पाणी द्यावे, जेणेकरून न प्यायलेले पाणी वाया जाणार नाही. व्यापारी संकुलांनीही पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईकरांनी या कपातीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने पाण्याचा वापर करावा, असं आवाहन पालिकेने केलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number