Mahesh Manjrekar on Mumbai : ‘मुंबईकरांचा श्वास कोंडतोय…’; ठाकरे बंधूंसमोर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली दोन कोटी जनतेची खदखद

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेताना मांजरेकर यांनी चक्क 'पर्याय मिळाला तर मी मुंबई सोडून जाईन' असे खळबळजनक विधान केले.

Mahesh Manjrekar on Mumbai : ‘मुंबईकरांचा श्वास कोंडतोय…’; ठाकरे बंधूंसमोर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली दोन कोटी जनतेची खदखद

Mahesh Manjrekar on Mumbai : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या ढासळत्या परिस्थितीवर अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेताना मांजरेकर यांनी चक्क ‘पर्याय मिळाला तर मी मुंबई सोडून जाईन’ असे खळबळजनक विधान केले. मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि अलोट गर्दीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर त्यांनी दोन्ही नेत्यांचे लक्ष वेधले.

‘मुंबई आता राहण्यायोग्य राहिलेली नाही’

मुलाखती दरम्यान मुंबईच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलताना मांजरेकर म्हणाले की, ‘आज एक मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना मला लाज वाटते. ज्या हवेत आपण श्वास घेतोय, तिथे ऑक्सिजनपेक्षा कार्बन डायऑक्साइड जास्त आहे. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 183 वर पोहोचला असून मला बाहेर पडल्यावर शारीरिक त्रास होतो. क्षमतेपेक्षा पाचपट हवा भरलेल्या फुग्यासारखी आज मुंबईची अवस्था झाली आहे.’

हेही वाचा – BMC Election 2026: ‘स्वतःच्या भावासाठी लोकशाहीची थट्टा नको’; हरिभाऊ राठोड यांचा राहुल नार्वेकरांना टोला

नियोजनशून्य विकास की विनाशाची गती?

महेश मांजरेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुंबईची हवेची गुणवत्ता इतकी खराब कधीच झाली नव्हती. विकासाच्या नावाखाली जे होर्डिंग्स लावले जात आहेत, ती विकासाची गती नसून विनाशाची गती आहे. नियोजनशून्य कामांमुळेच आज मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – Uddhav-Raj Thackeray Interview: “ज्यांना मुंबई वेगळी करायची आहे, ते महानगरपालिकेत आले तर मराठी माणूस…” राज ठाकरेंनी ‘तो’ मुद्दा आडपडदा न ठेवता मांडला

आता विकास नको, आधी मुंबई वाचवा – महेश मांजरेकर 

दरम्या, मांजरेकर यांनी ठामपणे आपली भूमिका मांडताना सांगितले की, मुंबईत आता अधिक विकासाला जागा उरलेली नाही. मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 31 लाखांच्या पुढे गेली असून, हे शहर ‘डिकन्जेस्ट’ (गर्दीमुक्त) कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बाहेरून येणारे लोंढे थांबवणे आता काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या विशेष मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, मुंबईच्या प्रश्नावर ठाकरे बंधू काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number