Mumbai Railway Mega block : मुंबईकरांनो, रविवारी प्रवासाला निघताय? जाणून घ्या, रेल्वे मेगाब्लॉक आणि लोकल विलंबाची मोठी अपडेट

उद्या (रविवार 17 मे) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील, काही गाड्यांचे मार्ग वळवले जातील.

Mumbai Railway Mega block : मुंबईकरांनो, रविवारी प्रवासाला निघताय? जाणून घ्या, रेल्वे मेगाब्लॉक आणि लोकल विलंबाची मोठी अपडेट

Mumbai Railway Mega block Updates : मुंबईकरांच्या प्रवासाची लाईफलाईन असलेल्या लोकल गाड्यांच्या सततच्या धावण्यामुळे त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असते. नेमक्या याच कारणासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तिन्ही मार्गांवर आलटून-पालटून ब्लॉक घेतले जातात. जर तुम्ही रविवारी मुलांच्या सुट्ट्या किंवा वीकेंड प्लॅन करून बाहेर पडणार असाल, तर आधी वेळापत्रक 2 वेळा तपासा आणि विचार करूनच घराबाहेर पडा. उद्या (रविवार 17 मे) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील, काही गाड्यांचे मार्ग वळवले जातील, तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होणार आहे.

मध्य रेल्वे: ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्ग प्रभावित
– मध्य रेल्वेवर प्रवाशांना रविवारी ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाउन दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक असेल.
– ब्लॉकची वेळ सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत असेल.
– या 5 तासांच्या काळात सर्व अप आणि डाउन जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही थांबवण्यात येणार आहेत.

हेही वाचा – Mumbai Borivali Fire News : काळ्या धुराचे दाट लोट अन् उंच ज्वाला…, बोरीवलीच्या अ‍ॅनेक्स मॉलमध्ये आग! अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

हार्बर रेल्वे: पनवेल ते वाशी दरम्यान फेऱ्या रद्द
– हार्बर मार्ग वापरणाऱ्या प्रवाशांनाही रविवारी प्रवासाचे नियोजन सांभाळून करावे लागेल, कारण पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर कामे चालणार आहेत.
– ब्लॉकची वेळ सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत असेल.
– या वेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द असतील. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वे: रात्रीचा ब्लॉक, दिवसा दिलासा
– पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना रविवारी दिवसा प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही, कारण येथील कामे रात्रीच्या वेळी केली जाणार आहेत.
– दादर स्थानकातील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि नायगाव स्थानकात नवीन पादचारी पुलाचे 2 स्पॅन गर्डर उभारण्यासाठी हा रात्रकालीन ब्लॉक असेल.
– धीमा मार्ग ब्लॉक: शनिवार मध्यरात्रीनंतर 1 ते रविवारी पहाटे 4 दरम्यान अप आणि डाउन धीमा मार्ग बंद राहील.
– जलद मार्ग ब्लॉक: मध्यरात्रीनंतर 2.30 ते 3.30 या 1 तासाच्या काळात अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक असेल.
– रात्रीच्या वेळी लोकल गाड्या पर्यायी मार्गाने चालवल्या जातील आणि काही फेऱ्या रद्द होतील. याशिवाय, 13 मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, त्या 20 मिनिटे ते 2 तास अशा विलंबाने धावणार आहेत.

हेही वाचा – IPS Transferred: पोलीस दलात मोठी खांदेपालट! 24 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती?

कोपर स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर
एकीकडे रेल्वे ब्लॉकची तयारी सुरू असतानाच, गुरुवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी घटना घडली. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने कामावर निघालेला 23 वर्षीय तरुण, गणेश अय्यर, गर्दीच्या लोकलमधून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number