BMC Commissioner: मुंबई महापालिकेला मिळणार नवे आयुक्त; ‘या’ दोन दिग्गज IAS अधिकाऱ्यांची नावं चर्चेत

सध्याच्या आयुक्तांचा कार्यकाळ संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर, नवीन आयुक्त म्हणून दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर आहेत.

BMC Commissioner: मुंबई महापालिकेला मिळणार नवे आयुक्त; ‘या’ दोन दिग्गज IAS अधिकाऱ्यांची नावं चर्चेत

BMC Commissioner: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) आयुक्तपदासाठी सध्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. सध्याच्या आयुक्तांचा कार्यकाळ संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर, नवीन आयुक्त म्हणून दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आणि नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या नावांची सध्या मंत्रालयात चर्चा आहे.

अश्विनी भिडे रेसमध्ये आघाडीवर
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचे नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. भिडे यांनी यापूर्वी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (MMRC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून आणि मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कामांचा त्यांना दांडगा अनुभव असल्याने, मुख्यमंत्र्यांच्या पसंतीस त्या उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

असीम गुप्ता यांच्या नावाचीही जोरदार चर्चा
दुसरीकडे, नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचे नावही आयुक्तपदासाठी ताकदीने समोर येत आहे. नगरविकास विभागात काम करत असताना त्यांचा राज्यातील महापालिकांच्या कामकाजाशी जवळून संबंध आला आहे. प्रशासकीय कामातील गती आणि अनुभवाच्या जोरावर गुप्ता यांना मुंबई महापालिकेची धुरा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरविकास विभागातील त्यांच्या अनुभवाचा फायदा मुंबईसारख्या मोठ्या शहराचे नियोजन करण्यासाठी होऊ शकतो, असे मानले जात आहे.

हेही वाचा – Central Railway Recruitment: मध्य रेल्वेची ‘ती’ जाहिरात रद्द; नव्या अधिसूचनेत ‘मराठी’ भाषेचा समावेश करण्यासाठी मनसे आक्रमक

कोणाच्या गळ्यात पडणार आयुक्तपदाची माळ?
मुंबई महापालिकेचे आयुक्तपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक मानले जाते. आगामी महापालिका निवडणुका आणि मुंबईतील विविध विकासकामांचा वेग पाहता, या पदावर कोणाची नियुक्ती होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या दोन दिग्गज नावांपैकी मुख्यमंत्री कोणावर विश्वास दाखवतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. लवकरच या नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number