Arvind Sawant : अरविंद सावंतांनी थेट कागदावर लिहून दिलं… ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर ठाकरेंच्या खासदाराचं उत्तर काय?

अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Arvind Sawant : अरविंद सावंतांनी थेट कागदावर लिहून दिलं… ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर ठाकरेंच्या खासदाराचं उत्तर काय?

MP Arvind Sawant Matoshree Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या वावड्या उठल्या असून उद्धव ठाकरे गटाचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट  (MP Arvind Sawant Gives Written Assurance of Loyalty to Uddhav Thackeray) घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कामाचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. सावंतांच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे बारीक लक्ष होते, मात्र त्यांनी ही बैठक शिवसेना आणि भारतीय कामगार सेनेच्या अंतर्गत कारभाराबाबत असल्याचे स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

कागदावर लिहून देण्यामागचे कारण
बैठकीदरम्यान एक रंजक प्रसंग घडला, जेव्हा अरविंद सावंतांनी आपण ठाकरेंशी प्रतारणा करणार नाही, असे चक्क कागदावर लिहून दिले. याबद्दल विचारले असता सावंत म्हणाले की, “उद्धवजींनी सहज विचारले की लिहून देणार का? मी तत्काळ होकार दिला. मी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडवा शिवसैनिक आहे, जो शब्दाला जागतो. जर मी लिहून दिले नसते, तर माध्यमांनी कदाचित वेगळ्याच अफवा पसरवल्या असत्या, म्हणूनच मी लेखी स्वरूपात माझी निष्ठा व्यक्त केली.” या कृतीतून सावंतांनी आपण शेवटपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार असल्याचा ठाम संदेश दिला आहे.

हेही वाचा – Rohit Pawar: ‘सुदैवाने मोठा अनर्थ टळला…’; भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार
अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2014 पासून सलग 3 वेळा विजय मिळवून लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. अलीकडच्या काळात ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात जाणार अशा वावड्या वारंवार उठत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदारांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे. सावंत यांनी ‘मातोश्री’शी असलेले आपले अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

राजकीय भूकंपाच्या चर्चा आणि वास्तव
राज्यात आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाल्यामुळे राजकीय स्थिरता धोक्यात आली होती. आता पुन्हा एकदा 8 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे, मात्र अरविंद सावंत यांनी अशा सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले की, “मी रोजच मातोश्रीवर येतो, माझ्यावर आणि माझा मातोश्रीवर पूर्ण विश्वास आहे.” संसदेच्या अधिवेशनादरम्यानही अशा हालचालींच्या बातम्या आल्या होत्या, मात्र सध्या तरी ठाकरेंचे निष्ठावान खासदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – Sharad Pawar: शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने वारकरी संप्रदाय आक्रमक! ‘धर्मांध शक्ती’ आणि ‘ 60 टक्के’ मांडणीच्या दाव्याने नवा राजकीय वाद पेटला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number