Mohan Bhagwat: ‘संघाला समजून घ्यायचं असेल तर संघ समजून घ्या, संघाचं काम…’; मुंबईतील कार्यक्रमात मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

संघ कोणत्याही स्पर्धेत किंवा कोणाच्या विरोधात नसून, समाजाला संघटित करणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.<br/>

Mohan Bhagwat: ‘संघाला समजून घ्यायचं असेल तर संघ समजून घ्या, संघाचं काम…’; मुंबईतील कार्यक्रमात मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित “आरएसएस यात्रा – न्यू होरायझन्सची 100 वर्षे” हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या सोहळ्यात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. ‘भाजप हा आरएसएसचा पक्ष नाही, तर त्यात संघाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. संघाचे काम केवळ स्वतःसाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे. संघाला समजून घ्यायचं असेल तर संघ समजून घ्या, संघाचं काम संघासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आहे,’ असंही यावेळी त्यांनी सांगितलं. संघ कोणत्याही स्पर्धेत किंवा कोणाच्या विरोधात नसून, समाजाला संघटित करणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघाला समजून घ्यायचे असेल तर शाखेत जा
मोहन भागवत म्हणाले की, संघाला दुरून पाहिल्यास अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. “संघाला सत्ता किंवा लोकप्रियता नको आहे. जर तुम्हाला संघ पाहायचा असेल, तर त्याच्या शाखांमध्ये जा आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबांकडे पहा. संघ ही कोणती निमलष्करी संघटना किंवा संगीत शाळा नाही, तर तो समाज घडवण्याचे केंद्र आहे,” असे त्यांनी नमूद केले. कोणत्याही देशाचे नशीब तिथल्या समाजामुळेच बदलते, असे सांगताना त्यांनी अमेरिका, ब्रिटन आणि चीनच्या विकासाचा दाखला दिला.

हेही वाचा – Pune Zilla Parishad Election: पुणे जिल्हा परिषदेत आतापर्यंत कुणाचं वर्चस्व? 2017 मध्ये राष्ट्रवादीचा झंझावात, यंदा चित्र बदलणार?

दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, भारतात फक्त हिंदू आहेत आणि दुसरे कोणीही नाही. हिंदू हे एखाद्या विशिष्ट समुदायाचे, कर्मकांडाचे किंवा धर्माचे नाव नसून ते एक ‘विश्लेषण’ आहे. ‘हिंदू’ हा शब्द पारशी आणि इराणमधून आला असला, तरी आपले धर्मशास्त्र हे ‘मानव धर्मशास्त्र’ आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चन हे जगातील इतर देशांतील मुस्लिम-ख्रिश्चनांपेक्षा वेगळे आहेत, कारण आपण सर्व एकाच संस्कृतीचा भाग आहोत.

देशात चार प्रकारचे हिंदू; ‘सांप्रदायिकता’ हा योग्य शब्द
सरसंघचालकांनी देशातील हिंदूंचे चार प्रकारांत वर्गीकरण केले: 1. जे अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणतात, 2. जे हो आम्ही हिंदू आहेत असं म्हणतात, 3. जे हिंदू आहोत हे मोठ्याने सांगतात आणि 4. जे आपण हिंदू आहोत हे विसरले आहेत. ‘सर्वांचा आदर करा, सर्वांना स्वीकारा आणि आपल्या श्रद्धेत दृढ राहून एकत्र राहा,’ असा संदेश त्यांनी दिला. तसेच ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द चुकीचा असून त्याऐवजी ‘सांप्रदायिकता’ हा शब्द वापरणे अधिक योग्य ठरेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number