Election 2026: सत्तेचा गैरवापर की लोकशाहीची थट्टा? बिनविरोध निवडींविरोधात मनसे-काँग्रेसची हायकोर्टात धाव; ‘ही’ महत्त्वाची मागणी केली

सत्ताधारी महायुतीचे डझनावारी उमेदवार विनासायास निवडून आल्याने, या प्रक्रियेत मोठा घोळ असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.<br/>

Election 2026: सत्तेचा गैरवापर की लोकशाहीची थट्टा? बिनविरोध निवडींविरोधात मनसे-काँग्रेसची हायकोर्टात धाव; ‘ही’ महत्त्वाची मागणी केली

Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत 'बिनविरोध' निवडींचा पाऊस पडल्याने राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी महायुतीचे डझनावारी उमेदवार विनासायास निवडून आल्याने, या प्रक्रियेत मोठा घोळ असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

याचिकेतील गंभीर दावे आणि मागण्या

मनसे नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पैशांचे आमिष दाखवून किंवा सत्तेचा धाक दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक दावा याचिकेत करण्यात आला आहे. कायद्यानुसार 'निवडून आलेला लोकप्रतिनिधी' असा स्पष्ट उल्लेख असून, 'बिनविरोध' विजयी होणाऱ्या उमेदवारांना किमान काही टक्के मते पडणे अनिवार्य करावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

हेही वाचा – Narayan Rane: भरसभेत नारायण राणेंना भोवळ, निवृत्तीच्या चर्चांना उधाण

आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न

दरम्यान, राज्य निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. तथापी, जोपर्यंत उच्च न्यायालयाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या बिनविरोध जागांचे अधिकृत निकाल जाहीर करू नयेत, असे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Nashik Election News: नाशिक महापालिकेच्या रणांगणात आता 'ग्लॅमर'चा तडका! लोकप्रिय अभिनेत्री नुपूर सावजी भाजपच्या तिकिटावर मैदानात

कुठे किती जागा बिनविरोध? 

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात भाजपचे 15 आणि शिवसेनेच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे. जळगावमध्ये 12 जागांवर बिनविरोध निवड झाली असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 6 जागा जिंकल्या आहेत. भिवंडीमध्ये भाजपचे 6 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 8 उमेदवार विजयी झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे 7, तर पनवेलमध्ये भाजपचे 6 आणि एका अपक्षासह एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचे 2 असे एकूण 5 उमेदवार विजयी झाले आहेत. धुळे महानगरपालिकेत भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number