Kalyan Banerjee: महिला खासदारांशी असभ्य वर्तन भोवलं; TMC नेते कल्याण बॅनर्जी निलंबित, लोकसभेत गदारोळानंतर मोठी कारवाई

महिला खासदारांशी अनादरयुक्त व्यवहार करणे आणि अयोग्य शब्दांचा वापर केल्याचा ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Kalyan Banerjee: महिला खासदारांशी असभ्य वर्तन भोवलं; TMC नेते कल्याण बॅनर्जी निलंबित, लोकसभेत गदारोळानंतर मोठी कारवाई

Kalyan Banerjee: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली. महिला खासदारांशी अनादरयुक्त व्यवहार करणे आणि अयोग्य शब्दांचा वापर केल्याचा ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या अधिवेशनाच्या उर्वरित संपूर्ण कालावधीसाठी त्यांना सभागृहातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी
लोकसभेच्या कामकाजादरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे सुरुवातीला कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. यानंतर कामकाजास पुन्हा सुरुवात होताच, कल्याण बॅनर्जी आणि NCPI च्या महिला खासदार मिताली बाग, शताब्दी रॉय तसेच काकोली घोष दस्तीदार यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. या वादात बॅनर्जी यांनी महिला लोकप्रतिनिधींविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप झाला. इतर सहकाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर बॅनर्जी सभागृहाबाहेर निघून गेले.

लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार अन् तातडीने कारवाईची मागणी
या घटनेचे गांभीर्य ओळखून काकोली घोष दस्तीदार आणि शताब्दी रॉय यांच्यासह इतर खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करण्यात आली. बॅनर्जी यांनी महिला खासदारांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

हेही वाचा – SC On NEET Protest: 'आमचा वेळ वाया घालवू नका…'; जंतरमंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

संसदीय कामकाज मंत्र्यांचा प्रस्ताव मंजूर; कामकाज दिवसभरासाठी तहकूब
या घटनेची गंभीर दखल घेत संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात सादर केला. लोकसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवला असता तो बहुमताने संमत झाला. यानंतर अध्यक्षांनी कल्याण बॅनर्जी यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करत तात्काळ सभागृह सोडण्याचे आदेश दिले. या राजकीय गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुसऱ्या दिवसापर्यंत तहकूब करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number