Sanjay Shirsat: CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आज तिथं काय होतयं त्यानंतरच…’

सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या चळवळीने आता प्रत्यक्ष आंदोलनाचे रूप घेतले असून, राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sanjay Shirsat: CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आज तिथं काय होतयं त्यानंतरच…’

Sanjay Shirsat: देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीतील जंतरमंतर येथे सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) कडून आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या चळवळीने आता प्रत्यक्ष आंदोलनाचे रूप घेतले असून, राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.  

हेही वाचा – NCP: राज्यसभेची लॉटरी कुणाला लागणार? राष्ट्रवादीच्या गोटात अनेक दिग्गज रेसमध्ये

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी या आंदोलनाच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “आज जंतरमंतरवर नेमके काय घडतयं ते पाहूया. आज त्याचा जो काही प्रमुख (अभिजीत दिपके) आहे, तो तिथे आलेला आहे. त्यामुळे तिथे आज नक्की काय परिस्थिती निर्माण होते आणि ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.”  


 

आंदोलनानंतरच भाष्य करणे योग्य ठरेल
शिरसाट यांनी पुढे बोलताना घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले, परंतु आंदोलनानंतर परिस्थिती पाहूनच पुढील भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “आज तिथे जे काही घडेल, त्या आंदोलनाचे स्वरूप आणि त्यांचे वर्तन कसे राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यानंतरच त्यावर अधिकृत किंवा सविस्तर भाष्य करणे योग्य राहील.” परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे तरुण एकत्र आले असले, तरी या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच तापू लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number