कल्पना करा. तुम्ही दिल्ली, मुंबई किंवा बंगळूरुच्या उकाड्यात थंडगार डायट कोक पिण्याची इच्छा होतेय पण जेव्हा तुम्ही फ्रिज उघडता तेव्हा आतमध्ये काहीच नाही, संपूर्ण मूडच खराब होऊन जाईल. होय, यावेळी उष्णता केवळ लोकांना घामच फोडत नाहीये, तर त्यांच्या आवडत्या 'शुगर फ्रि कोल्डड्रिंक'पासूनही लांब आहे. युद्धाचा खरा परिणाम आता जाणवत आहे अशा चर्चा आता सोशल मिडियावर सुरू झाल्या आहेत.
खरं तर, मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाचा थेट परिणाम आता तुमच्या दैनंदिन जीवनावर होत आहे, आणि हा परिणाम इतका विचित्र आहे की लोक हसतही आहेत आणि चिंतितही आहेत. आधी एलपीजी, आणि आता डाएट कोक. मुंबई, बंगळूर, पुणे आणि दिल्ली-एनसीआरसारख्या प्रमुख शहरांमधील दुकानांमधून डायट कोक झपाट्याने संपत आहे. परिस्थिती अशी आहे की, जे काही थोडे कॅन उपलब्ध असतात ते काही मिनिटांतच संपून जातात. दुकानदारांनी आता हताश होऊन म्हटले आहे की, माल येतो तितक्याच वेगाने संपत आहे.
आता गोष्टीतला खरा ट्विस्ट असा आहे की, ही टंचाई कोणत्याही सामान्य कारणामुळे नाही, तर ॲल्युमिनियमच्या कॅनच्या तुटवड्यामुळे आहे. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि सर्वात मोठी समस्या ही आहे की, डायट कोक प्रामुख्याने कॅनमध्ये विकला जातो, तर इतर पेये बाटल्यांमध्येही उपलब्ध आहेत. यामुळेच डायट कोकवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे.
भारतात कोका-कोलाची इतर पेये प्लास्टिक बॉटल्स आणि कॅन या दोन्ही स्वरूपात मिळतात. परंतु, डाएट कोक केवळ कॅनमध्येच उपलब्ध असल्याने ॲल्युमिनियमच्या टंचाईचा या ब्रँडला सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि अहमदाबाद यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये डाएट कोकचा स्टॉक एकतर संपला आहे किंवा अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे.
आता, कंपन्या युएई, श्रीलंका आणि दक्षिण आशियामधून कॅन्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इथेही एक अडचण आहे. हे कॅन्स 25 ते 30% अधिक महाग आहेत. शिवाय, भारतातील कॅन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची क्षमता मर्यादित आहे आणि नवीन कारखाना उभारण्यासाठी एक वर्ष लागू शकते. काही कंपन्या तर आपला स्टॉक अधिक फायदेशीर उत्पादनांमध्ये गुंतवत आहेत, ज्यामुळे डायट कोक आणखी मागे पडत आहे.