Instagram Account Deleted: मराठी अभिनेत्याला इन्स्टाग्रामचा दणका; लाखो फॉलोअर्स अन् कोटींनी व्ह्यूज असलेलं ‘व्हेरिफाईड’ अकाउंट एका रात्रीत गायब

गेल्या दोन महिन्यांपासून या अनपेक्षित कारवाईविरुद्ध न्यायालयीन आणि तांत्रिक लढा दिल्यानंतर, अखेर अभिनेत्याने पुन्हा एकदा 'शून्यातून' प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.<br/>

Instagram Account Deleted: मराठी अभिनेत्याला इन्स्टाग्रामचा दणका; लाखो फॉलोअर्स अन् कोटींनी व्ह्यूज असलेलं ‘व्हेरिफाईड’ अकाउंट एका रात्रीत गायब

Instagram Account Deleted:  ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता विवेक सांगळे सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने कोणतीही पूर्वसूचना न देता विवेकचे अधिकृत अकाउंट अचानक डिलीट केले आहे. या अकाउंटवर 1,42,000 हून अधिक फॉलोअर्स होते. गेल्या दोन महिन्यांपासून या अनपेक्षित कारवाईविरुद्ध न्यायालयीन आणि तांत्रिक लढा दिल्यानंतर, अखेर विवेकने पुन्हा एकदा ‘शून्यातून’ प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय?
3 जानेवारी 2026 रोजी विवेकचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक बंद झाले. हे अकाउंट केवळ लोकप्रियच नव्हते, तर त्यावर त्याने पोस्ट केलेल्या अनेक रील्सना लाखो-कोटींमध्ये व्ह्यूज होते. त्याच्या एका व्हिडिओला तर तब्बल 3 कोटी 20 लाखांहून (32 Million) अधिक व्ह्यूज मिळाले होते. विशेष म्हणजे, अकाउंट ‘व्हेरिफाईड’ (ब्लू टिक) असूनही मेटा कंपनीने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याने कलाविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे.

मेटा आणि बीकेसी टीमकडे धाव, पण पदरी निराशाच
आपली अनेक वर्षांची मेहनत वाचवण्यासाठी विवेकने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याने मुंबईतील BKC येथील मेटाच्या कार्यालयात जाऊन टीमची भेट घेतली. तसेच इन्स्टाग्राम कस्टमर केअर आणि अमेरिकेतील (USA) मुख्य मेटा टीमला असंख्य ई-मेल्स केले. नियमानुसार आवश्यक असलेली सर्व अपील प्रक्रिया पूर्ण करूनही दोन महिने उलटले, तरी कंपनीकडून त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद किंवा स्पष्टीकरण मिळाले नाही.

“इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरलं…”
आपली व्यथा मांडताना विवेक भावूक झाला. तो म्हणाला, “गेल्या दोन महिन्यांपासून माझे मित्र आणि चाहते विचारत होते की तू सोशल मीडियावरून गायब का झालास? आज मला सांगावसं वाटतंय की माझी कोणतीही चूक नसताना माझे अकाउंट हटवण्यात आले. माझी इतक्या वर्षांची डिजिटल मेहनत एका क्षणात पुसली गेली.” आजच्या काळात कलाकारांसाठी सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम नसून ब्रँड प्रमोशन आणि कमाईचे महत्त्वाचे साधन आहे, त्यामुळे विवेकसाठी हा मोठा व्यावसायिक फटका मानला जात आहे.

हेही वाचा – Kinshuk Vaidya: ‘शाका लाका बूम बूम’ फेम संजू झाला बाबा, घरी झालं चिमुकल्याचं आगमन

जिद्दीने पुन्हा एकदा नवी सुरुवात
इतका मोठा फटका बसूनही विवेकने हार मानलेली नाही. त्याने आता एक नवीन इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले असून, एका विशेष व्हिडिओद्वारे चाहत्यांना पुन्हा साथ देण्याचे आवाहन केले आहे. “जे कमावले होते ते गेले, पण तुमचं प्रेम पुन्हा कमावीन,” अशी जिद्द त्याने बोलून दाखवली आहे. चाहत्यांनीही त्याच्या या नव्या प्रवासाला भरभरून शुभेच्छा दिल्या असून मेटा कंपनीच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number