Sanjay Shirsat: ‘अशोक खरातची अनेक प्रकरणं बाहेर पडतील, पण…’ संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

खरात यांची केवळ एक-दोन नव्हे, तर अनेक प्रकरणं आता बाहेर पडतील आणि या गुन्ह्यांमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध घ्यावा लागेल, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.<br/>

Sanjay Shirsat: ‘अशोक खरातची अनेक प्रकरणं बाहेर पडतील, पण…’ संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

Sanjay Shirsat: भोंदू अशोक खरात यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी खरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “खरात यांची केवळ एक-दोन नव्हे, तर अनेक प्रकरणं आता बाहेर पडतील आणि या गुन्ह्यांमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध घ्यावा लागेल,” असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.

महिला अत्याचार आणि जमिनीचे व्यवहार; आरोपांची सरबत्ती
संजय शिरसाट यांनी अशोक खरात यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप लावले आहेत. “खरात यांनी केवळ जमिनीच्या खरेदी-विक्रीतच नव्हे, तर महिलांवरील अत्याचारासारखी अनेक घृणास्पद प्रकरणे केलेली आहेत. या सर्व प्रकरणांची व्याप्ती मोठी असून, त्यातून त्यांची आता सहजासहजी सुटका होणार नाही,” असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे आगामी काळात खरात यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘ही एक मोठी साखळी, सर्वांना अटक होणार’
हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून यामागे एक मोठी साखळी सक्रिय असल्याचा संशय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. “हे एकट्या दुकट्याचे काम नाही, तर ही पूर्ण साखळी आहे. या साखळीत कोण-कोण सहभागी आहे आणि हे रॅकेट कसे चालते, याचा शोध पोलीस घेत आहेत. ही गुन्हेगारी साखळी कशी तोडता येईल आणि संबंधित सर्व आरोपींना कशी अटक करता येईल, यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Raigad NCP Banner : रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवर फक्त तटकरे! सुनेत्रा पवार, अजित पवारांना वगळलं; चर्चांना उधाण

अटकेसंदर्भात सरकार घेणार ठोस निर्णय
अशोक खरात यांच्या अटकेसंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले की, “कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि पुराव्यांच्या आधारे सरकार अटकेबाबत पुढील निर्णय घेईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही.” शिरसाट यांच्या या विधानामुळे आता या प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाणार आणि यात आणखी कोणाचे धाबे दणाणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number