Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला ‘मालव्य राजयोग’; या 6 राशींचे नशीब फळफळणार! भरभरून पैसा, परदेशवारी आणि वैवाहिक सुख मिळणार

पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला हा योग मानवी जीवनात वैभव, सुख आणि ऐश्वर्य घेऊन येतो. या शक्तिशाली योगामुळे 6 राशींच्या व्यक्तींना भाग्याची भक्कम साथ मिळेल.

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला ‘मालव्य राजयोग’; या 6 राशींचे नशीब फळफळणार! भरभरून पैसा, परदेशवारी आणि वैवाहिक सुख मिळणार

Akshaya Tritiya Malavya Rajyog 2026 : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा सण अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानला जातो. पंचांगानुसार, हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी धन-संपत्तीची देवता देवी लक्ष्मीची पूजा केल्याने अखंड भाग्याची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर ग्रहांच्या स्थितीत एक मोठा बदल होणार आहे.

सुखाचा आणि विलासाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह दुपारी 03:51 वाजता स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा शुक्र स्वतःच्या किंवा उच्च राशीत केंद्र स्थानी असतो, तेव्हा 'मालव्य राजयोग' निर्माण होतो. पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला हा योग मानवी जीवनात वैभव, सुख आणि ऐश्वर्य घेऊन येतो. या शक्तिशाली योगामुळे 6 राशींच्या व्यक्तींना भाग्याची भक्कम साथ मिळणार असून त्यांच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होणार आहे.

वृषभ (Taurus) – व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आणि प्रगती
शुक्राचा हा प्रवेश तुमच्याच राशीत होत असल्याने तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि प्रभावी होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कला, माध्यम किंवा ग्लॅमर क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील.

कर्क (Cancer) – उत्पन्नाचे नवीन स्रोत
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र अराव्या स्थानी विराजमान होणार असून हे स्थान उत्पन्नाचे मानले जाते. यामुळे तुमच्या मिळकतीत मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली तुमची जुनी येणी वसूल होतील आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. तुमची प्रलंबित स्वप्ने या काळात प्रत्यक्षात उतरतील.

कन्या (Virgo) – भाग्योदय आणि परदेश वारी
तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी होणारे हे गोचर तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारे ठरेल. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर ही उत्तम संधी असेल. या काळात तुम्ही धार्मिक सहलीला किंवा परदेश प्रवासाला जाण्याचे दाट योग आहेत.

हेही वाचा – Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीऐवजी खरेदी करा 'या' 4 वस्तू; घरात नांदेल सुख-समृद्धी

वृश्चिक (Scorpio) – भागीदारीत लाभ आणि वैवाहिक सौख्य
शुक्र तुमच्या सातव्या भावात प्रवेश करणार असून यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व जुने वाद संपून नात्यात गोडवा निर्माण होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ मोठ्या आर्थिक नफ्याचा ठरणार आहे. जे तरुण लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना या काळात विवाहाचे अतिशय उत्तम प्रस्ताव मिळतील.

मकर (Capricorn) – शैक्षणिक यश आणि संतती सुख
मकर राशीच्या पाचव्या स्थानी होणाऱ्या या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होईल आणि अभ्यासात प्रगती होईल. मुलांच्या संदर्भात एखादी मोठी आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. तुमची कल्पनाशक्ती वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.

कुंभ (Aquerius) – मालमत्ता आणि वाहन योग
तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानी शुक्राचे आगमन होत असल्याने घरगुती सुख-सुविधांमध्ये मोठी वाढ होईल. नवीन घर किंवा एखादे आलिशान वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या अक्षय तृतीयेला पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या आईचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या जीवनशैलीत विलासी वस्तूंचा समावेश होईल.

हेही वाचा – Akshaya Tritiya 2026 Date: अक्षय तृतीया कधी आहे? तारखेबाबतचा संभ्रम दूर; जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number