Internal Conflict in NCP: राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; सुनील तटकरेंचे पद धोक्यात? निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात बड्या नेत्यांच्या पदांना कात्री

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Internal Conflict in NCP: राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; सुनील तटकरेंचे पद धोक्यात? निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात बड्या नेत्यांच्या पदांना कात्री

Internal Conflict in NCP:  अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठे फेरबदल आणि अंतर्गत संघर्षाचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या यादीत पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांपुढील पदांचा उल्लेख गायब असल्याने, पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.

सुनील तटकरेंचे पद धोक्यात?
सर्वात मोठा धक्का खासदार सुनील तटकरे यांना बसल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे यांच्या नावासमोर 'प्रदेशाध्यक्ष' या पदाचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, अरुणाचल प्रदेशचे नेते टोको तातूंग यांच्या नावापुढे 'प्रदेशाध्यक्ष' असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले असताना, तटकरेंच्या बाबतीत हा बदल जाणीवपूर्वक करण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पार्थ आणि जय पवारांकडे मोठी जबाबदारी
पक्षाने 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला जी यादी सादर केली, त्यामध्ये पवार कुटुंबातील नव्या पिढीचे वर्चस्व दिसून येत आहे.

सुनेत्रा पवार: राष्ट्रीय अध्यक्ष
पार्थ पवार: जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस)
जय पवार: जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस)

याउलट, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे प्रमुख पदांच्या चौकटीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हसन मुश्रीफ यांचा बचावात्मक पवित्रा
या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ म्हणाले की, "सुनील तटकरे आजही आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाला दिलेले ते पत्र केवळ राष्ट्रीय कार्यकारिणीपुरते मर्यादित आहे, त्यामुळे त्यावरून गैरसमज करून घेण्याचे कारण नाही."

हेही वाचा – Maharashtra Invesment : आता महाराष्ट्रात नोकरीची मोठी संधी! एकीकडे AI मुळे नोकऱ्यांवर संकट असताना खासदार श्रीकांत शिंदेंनी उचललं मोठ पाऊल

पक्षात दोन गट पडल्याची चर्चा
मागील काही काळापासून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. आता थेट अधिकृत पत्रातून पदांचा उल्लेख वगळण्यात आल्यामुळे या नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला सारले जात असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतील हे अंतर्गत राजकारण पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number